एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूतच्या वादळानंतर अभिनेत्रीचं काम थांबलं, 6 वर्षांनी अभिनयात पुनरागमन; म्हणाली ' Exit स्वेच्छेने नव्हती '

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता.

Sushant Singh Rajput Riya Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी वेबसीरिज ‘फॅमिली बिझनेस’मधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता. जून 2020 नंतर तिला प्रचंड मानसिक तणाव आणि सार्वजनिक टीकेला सामोरं जावं लागलं.

अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या....

या संपूर्ण कालखंडाकडे मागे वळून पाहताना रियाने अभिनयातून दूर जाण्याचा निर्णय किती वेदनादायक होता, याबद्दल खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, जवळपास दहा वर्षं अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडल्यानंतर अभिनय सोडावा लागणं तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. अभिनयाचं स्वप्न बाजूला ठेवण्यासाठी तिला अनेक थेरपी सेशन्स घ्यावे लागले. “मला अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या, त्यामुळे त्याबद्दल विचार करणंही थांबवावं लागलं,” असं ती म्हणाली.

रिया पुढे सांगते की, सुरुवातीला तिने अनेक प्रोजेक्ट्स नाकारले आणि स्वतःला अभिनयापासून पूर्णपणे दूर ठेवलं. मात्र तिच्या कमबॅकमागे हंसल मेहता यांचा मोठा वाटा असल्याचं तिने मान्य केलं. “हंसल सर आणि लेखकांनी मला विचारलं की मला अभिनयापासून रोखणारं नेमकं काय आहे. मी त्यांना सांगितलं की मी अभिनय सोडला आहे. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की, त्यामुळेच तुला हे काम करायला हवं. तू चांगलं करशील की नाही, याला अर्थ नाही,” असं रियाने सांगितलं.

अभिनयातून Exit स्वेच्छेने नव्हती..

या निर्णयाकडे मागे वळून पाहताना रिया म्हणते की, आता मला हा निर्णय योग्य वाटतो. “सेटवर परत जाणं वेगळंच होतं. गेल्या सात वर्षांत खूप काही अनुभवलं आहे,” असं तिने नमूद केलं. दरम्यान, अभिनयापासून दूर राहण्याचा काळ हा आपला स्वेच्छेचा निर्णय नव्हता, हेही रियाने स्पष्ट केलं. “त्या काळात कुणालाच माझ्यासोबत काम करायचं नव्हतं, तो काळ अत्यंत वेदनादायक होता,” असं ती म्हणाली. या कठीण काळात मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण सावरू शकलो, असंही तिने सांगितलं. “माझे मित्र आणि कुटुंब नसते, तर कदाचित मी या सगळ्यातून बाहेर येऊ शकले नसते,” अशी भावना तिने व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget