मुंबई : दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो.भारताचा तिरंगा पाहून प्रत्येकाचं उर भरून येतं. दिमाखात फडकणारा तिरंगा आणि कानावर पडणारे देशभक्तीपर गीतांचे बोल ऐकून प्रत्येकाच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. जसं प्रत्येक सणाला बॉलिवूडमधील गाण्यानी चार चांद लागतात.  त्याचप्रकारे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देखील बॉलिवूडमधील अनेक देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते.आपण बॉलिवूडमधील लोकप्रिय ठरलेली देशभक्तीपर गाणी कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.


मेरे देश की धरती सोना उगले - या क्लासिक गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे.देशभक्तीपर गाण्यांमध्ये कायमच वरती राहिले आहे. हे गाणे मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटातील आहे. हा चित्रपट 1967 साली प्रदर्शित झाला होता.



दुल्हन चली- हे देखील मनोज कुमार यांच्या चित्रपटातील गाणे आहे.



ऐ मेरे प्यारे वतन - 1961 साली प्रदर्शित झालेल्या काबुलीवाला चित्रपटातील हे गाणे आहे. मन्ना डे यांनी गाणे बलराज साहनी यांच्या चित्रपटासाठी गायले होते.



आय लव्ह माय इंडिया - शाहरुख खानच्या परदेश चित्रपटातील हे गाणे आहे. या चित्रपटात अमरीश पुरी हे परदेशात राहून देखील देशावर असणारे प्रेम दाखवले आहे. 



मेरा रंगदे बसंती - अजय देवगणच्या शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित  द लेजंड ऑफ भगत सिंग या सिनेमातील ‘मेरा रंगदे बसंती’ हे गाणं देशासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीरांना समर्पित आहे.




 ऐसा देस है मेरा - वीर झारा चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं भारत देशाच्या समृद्धीचं वर्णन करणारं आहे. भारताची परंपरा, भारताचं वैविध्य या गाण्यातून मांडण्यात आलंय.



तेरी मिट्टी - अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या सिनेमातील तेरी मीट्टी हे गाणं एका सैनिकाच्या मनात असलेल्या देशप्रेमाचं वर्णन करणारं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. प्रतीक बच्चन म्हणजेच बी प्राकने हे गाणं गायलं आहे. 



ऐ वतन मेरे आबाद रहे तू - 2019 साली आलेल्या राझी  सिनेमातील ‘ऐ वतन’ हे गाण आहे. अरिजीत सिंह आणि सुनिधी चौहान दोघांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं असून हे गाणं अंगावर रोमांच उभे करणारं आहे.



महत्त्वाची बातमी : 


Republic Day Parade 2022 Live : कधी अन् कुठे पाहाल प्रजासत्ताक दिनाचा लाईव्ह कार्यक्रम!


Sayaji Shinde : प्रजासत्ताक दिन साजरा करा निसर्गाच्या सान्निध्यात, 'फॅमिली मॅन' सोबत भेटा ट्री मॅनला


Republic Day 2022 : बीटींग द रिट्रीट सोहळ्यात बदल,कार्यक्रम सांगतेला 'सारे जहॉं से अच्छा' धुन