Sayaji Shinde : अभिनेते आणि निसर्गप्रेमी  सयाजी शिंदे (Sayaji Shinde) वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. येणारा प्रजासत्ताक दिन सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी आणि लेखक अरविंद जगताप निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करणार आहेत. ते जंगलात वृक्ष लागवड करणार आहेत. 


निसर्गाविषयी जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सयाजी शिंदेंच्या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल 200-300 वर्षे देण्याचं काम झाडंच करत असतात. हीच बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावणे आणि ती जगवण्याचं कार्य करीत असते. 


26 जानेवारी 2022 रोजी 10.30 वाजता या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी आणि अरविंद जगताप यांच्यासह नागरिकांनीदेखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सह्याद्री देवराईच्या सयाजी शिंदे यांनी केले आहे. 


सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात  झोकून दिले आहे. सह्याद्री देवराई उपक्रम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये यशस्वी केल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला आहे. सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar: नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातून कौतूकाचा वर्षाव


Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार


Spider-Man : No Way Home ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट


राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशाचा फड रंगणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha