एक्स्प्लोर

Raundal : 'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Raundal : आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा 'रौंदळ' (Raundal) हा अॅक्शनपट मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'रौंदळ' चित्रपटाच्या रावडी पोस्टरनं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता याचा लक्षवेधी टीझर रिलीज करण्यात आला आहे. गजानन पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कोणताही संवाद नसलेला 'रौंदळ'चा टीझर लक्ष वेधून घेणारा आहे. 'रौंदळ'मध्ये धडाकेबाज अॅक्शन पहायला मिळणार असल्याचे संकेत रिलीज करण्यात आलेला टिझर देतो. पोस्टरवर दिसलेल्या भाऊसाहेबचं रौद्र रूप टीझरमध्येही दिसतं. गुंडांचा धुव्वा उडवणारा भाऊ यात दिसणार असून, तो टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षावसाठी पात्र ठरणार आहे. भाऊसाहेबच्या या चित्रपटानं फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच उत्सुकता वाढवली आहे. यात आता टिझरचीही भर पडली आहे. 'रौंदळ'चा थरारक टिझर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा आहे. या चित्रपटात काहीतरी थरारक पहायला मिळणार याची चाहूल टीझर पाहिल्यावर लागते. या चित्रपटात भाऊसाहेबची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत जमली आहे हे गुपित अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. याखेरीज इतर कलाकारांची नावंही गुलदस्त्यात आहेत.

पाहा टीझर:

'रौंदळ'च्या टीझरबाबत भाऊसाहेब म्हणाला की, 'रौंदळ' हा मराठीतील आधुनिक काळातील अॅक्शनपट आहे. यापूर्वी कधी न पाहिलेले अॅक्शन सीन्स या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. सुरुवातीपासून अखेरपर्यंत उत्सुकता वाढवणारं कथानक या चित्रपटाचा महत्वपूर्ण प्लस पॉइंट आहे. याला सुमधूर संगीताची जोड देऊन एक परिपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा 'रौंदळ'च्या संपूर्ण टिमचा प्रयत्न आहे. गजानन पडोळ यांनी सुरेख दिग्दर्शन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'रौंदळ' बनवला असल्याचेही भाऊसाहेब म्हणाला.

महत्वाच्या या इतर बातम्या: 

 

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget