एक्स्प्लोर

धुरंधर 2चा बॉक्स ऑफिसवर धडाका; दुसऱ्या दिवशी 21% घट, तरी 200 कोटी पार, चित्रपटाची स्टोरी काय?

Dhurandhar: The Revenge Roars at Box Office: धुरंधर २ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 200 कोटींचा टप्पा पार केला.

Dhurandhar 2 Continues Strong Run Despite Day 2: धुरंधरनंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेल बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  धुरंधर द:रिवेंजने धुवांधार कमाईला देखील सुरुवात केली आहे. देशातील चौथ्या  सर्वाधिक ओपनिंग डेचा  विक्रम आपल्या नावे करत, रणवीर सिंहच्या या चित्रपटाने दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा वेग थोडा मंदावला असला तरी, लवकरच हा चित्रपट इतिहास रचेल एवढं मात्र नक्की.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या 80 कोटींहून अधिक रुपये कमावले आहे.  या चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाईड कलेक्शन 269.39 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. धुरंधरचीही घौडदौड थांबत नसल्याचं चित्र आता दिसत आहे.

18 मार्च  रोजी प्रीव्ह्यू शोसह हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पेड प्रीव्ह्यू शोमध्ये या चित्रपटाने इतिहास रचला. धुरंधर 2 या चित्रपटाने प्रीव्ह्यू शोमध्ये तब्बल 43 कोटींची कमाई केली. तसेच ओपनिंग डेला 100 कोटींहून अधिक कमाई केली.  दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने डंका गाजवला. पण दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये  21.3% घट झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, विकेंडला या चित्रपटाला किती कोंटीचा फायदा होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

धुरंधर: द रिव्हेंजमध्ये रणवीर सिंहने भारतीय गुप्तहेर हमजा  अली मझारीची भूमिका साकारली आहे. ज्याचा भूतकाळ जसकिरत सिंह रंगी म्हणून दाखवण्यात आला आहे.  पाकिस्तानी गुंड रहमान डकैतला संपवल्यानंतर हमजा लियारीचा कारभार सांभाळतो. आपल्या देशावरील हल्ल्यांचा एक - एक करुन बदला घेतो.  हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.  या चित्रपटात राकेश बेदी, अर्जून रामपाल, संजय दत्त, सारा अर्जून, दानिश पंडोर आणि  दानिश इकबाल या कलाकारांनी उत्तम व्यक्तीरेखा साकारली आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार,  धुरंधर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 20,125 शोमधून 80.72 कोटी रुपये कमावले आहेत.  दरम्यान, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 21.3 टक्क्यांनी घट झाली आहे.  आदित्य धरने धुरंधर 2 संपूर्ण भारतात प्रदर्शित केला. हिंदीसह 5 भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.  दुसऱ्या दिवसाच्या चित्रपटाच्या कमाईला ब्रेकडाऊन केले तर, हिंदीतून धुरंधर 2 चित्रपटाला 78.94 कोटींची कमाई केली. तर, कन्नडमधून 3 लाख रुपये. मल्याळममधून 1 लाख. तामिळमधून 44 लाख. तर,  तेलुगुमधून चित्रपटाने 1.30 कोटींची कमाई केली आहे. तर, ओपनिंग डेला हिंदी वर्जनने सर्वाधिक 99.10 कोटींची कमाई केली. 

दरम्यान, धुरंधर चित्रपटाचे तिकिटे महाग असूनही,  हा चित्रपट सिनेमागृहात गर्दी खेचण्यास यशस्वी ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget