Alia Ranbir Wedding :  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt)  यांचा विवाह सोहळा आज (14 एप्रिल) पार पडणार आहे. रणबीरच्या आईनं म्हणजेच अभिनेत्री नितू कपूर (Neetu Singh) यांनी तसेच त्याची बहिण रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या लग्नाची तारिख काल (13 एप्रिल) जाहीर केली. रणबीर हा त्याच्या वैयक्तिय आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर आणि रिद्धिमा यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रिद्धिमानं रणबीरच्या गर्लफ्रेंड्सबाबत सांगितले होते. 


रिद्धिमानं द कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं, 'जेव्हा मी लंडनमधून भारतात परत आले तेव्हा रणबीरची गर्लफ्रेंड घरी आली होती. तिनं त्यावेळी जो टॉप घातलेला तो टॉप गेली कित्येक दिवस मी शोधत होते. मला नंतर कळालं की रणबीर माझे कपडे चोरून त्याच्या गर्लफ्रेंडला भेट म्हणून देत होता '


रणबीरची मोठी बहिण रिद्धिमानं बिझनेस मॅन  भरत साहनी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. भरत आणि रिद्धिमा यांना समारा नावाची मुलगी आहे. रिद्धिमा ही ज्वेलरी डिझायनर आहे. 


काल (13 एप्रिल) आलिया आणि रणबीरचा मेहंदी आणि हळद सोहळा पार पडला. आज हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन होणार आहे.  रणबीर कपूरच्या घरी वास्तू मध्ये होणार आहे.  पंजाबी रितीरिवाजांनुसार होणाऱ्या या लग्नात वरातही काढण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. 


हेही वाचा :