Alia Ranbir Wedding : प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज म्हणजेच 14 तारखेला बैसाखीच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधणार आहेत. कालपासून (13 एप्रिल) रणबीर आणि आलियाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरूवात झाली आहे. काल मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्या दरम्यान कृष्णा राज येथे दोन आलिया आणि रणबीरचे फॅन्स पोहचले. त्या चाहत्यांनी आलिया आणि रणबीरसाठी खास भेटवस्तू दिली. सध्या या सूरतवरून आलेल्या चाहत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


सूरत येथून आलेल्या दोन तरूणांनी आलिया आणि रणबीरला भेट देण्यासाठी गोल्ड प्लेटेड फुलांचा बुके आणला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये रौनक नावाचा तरूण या सोन्याच्या पुष्पगुच्छाबद्दल माहिती देताना दिसत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ- 






काल (13 एप्रिल) आलिया आणि रणबीरचा मेहंदी आणि हळद सोहळा पार पडला. आज हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन होणार आहे.  रणबीर कपूरच्या घरी वास्तू मध्ये होणार आहे.  पंजाबी रितीरिवाजांनुसार होणाऱ्या या लग्नात वरातही काढण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. 


रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी 
आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण दोहर जोया अख्तर, संजय लीला भन्साळी, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 


हेही वाचा :