Intelligence Bureau Vacancy 2022 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोनं सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या 150 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती ग्रेड-2/तांत्रिक अंतर्गत ACIO च्या पदांवर केली जाणार आहे. GATE स्कोअर कार्ड असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्जाची प्रक्रिया 16 एप्रिल 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2022 आहे.
भरती प्रक्रियेच्या अधिसूचनेत जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची सुरुवातीची तारीख : 16 एप्रिल 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मे 2022
रिक्त जागांचा तपशील
एकूण 150 रिक्त पदांपैकी 56 पदे संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आणि 94 पदे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागातील उमेदवारांकडून भरली जातील.
शैक्षणिक पात्रता
भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये वैध GATE स्कोअर 2020, 2021 आणि 2022 असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्रासह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान, संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
GATE मार्क्स आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. GATE स्कोअरचे वेटेज 1000 आहे आणि मुलाखत 175 गुणांची असेल. मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना सायकोमेट्रिक/अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये हजर राहावं लागेल.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये शुल्कही भरावं लागणार आहे. कृपया लक्षात घ्या की SC, ST, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी
- BOB Recruitment 2022 : BOB मध्ये नोकरी करण्याची संधी, 26 पदांची भरती, लवकरात लवकर अर्ज करा
- MPSC च्या कक्षेतील 100 टक्के पदांची भरती होणार, शासन निर्णय जारी
- Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेच्या 'या' विभागासाठी मेगा भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या