एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार

Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: अभिनेता रणबीर कपूर यानं प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये जमिनीचा एक भूखंड खरेदी केलाय.

Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याचा आगामी सिनेमा, 'रामायणम्' (Ramayana) सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी केलं आहे. या सिनेमात तो प्रभू श्रीराम (Prabhu Shree Ram) यांची भूमिका साकारणार असून, साई पल्लवी (Sai Pallavi) देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही काळापासून रणबीर कपूर या सिनेमामुळे व्यस्त आहे. दरम्यान, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच, रणबीर कपूरनं असं एक पाऊल उचललं आहे, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. 

अभिनेता रणबीर कपूर यानं प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये जमिनीचा एक भूखंड खरेदी केलाय. त्यानं ही मालमत्ता 'अभिनंदन लोढा' यांच्या 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (HoABL) या संस्थेच्या 'द सरयू' (The Saryu) नावाच्या एका प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत खरेदी केली आहे. हा भूखंड 2,134 चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'च्या एका वृत्तानुसार, या मालमत्तेचं मूल्य 3.31 कोटी रुपये इतकं आहे. हा प्रकल्प अयोध्येमध्ये, शरयू नदीच्या काठावर 75 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात विस्तारलेला, ऐश्वर्य आणि आध्यात्म यांचा एक भव्य संगम दर्शवतो. या स्थळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, आधुनिक सुखसुविधा पुरवण्यासोबतच, इथे 'द लीला' (The Leela) समूहाद्वारे संचालित पाच एकरांवर विस्तारलेलं, केवळ शाकाहारी भोजन उपलब्ध असलेलं एक आलिशान हॉटेलही असेल. 

अयोध्येत जमीन खरेदी करण्याच्या आपल्या निर्णयानंतर रणबीर कपूर फारच इमोशनल झालाय. त्यानं म्हटलंय की, "माझा असा विश्वास आहे की, अयोध्येनंच माझी निवड केलीय आणि मी केवळ त्या हाकेला साद दिलीय... हे शहर आपल्या ऐतिहासिक मुळांचा आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे..."

दरम्यान, रणबीर कपूर आता रुपेरी पडद्यावरही प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी 'रामायण' हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात भव्य प्रकल्पांपैकी एक असून, त्याचं अंदाजे बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. रणबीरसोबतच, या सिनेमात यश (रावणाच्या भूमिकेत), साई पल्लवी (सीता मातेच्या भूमिकेत), सनी देओल (हनुमानाच्या भूमिकेत) आणि रवी दुबे (लक्ष्मणाच्या भूमिकेत) यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi: साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget