एक्स्प्लोर

Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi: साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?

Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi:  'रामायणम्'च्या निर्मात्यांची साई पल्लवीच्या हिंदी शब्दांच्या उच्चारावरुन डोकेदुखी वाढली आहे.

Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या 'रामायणम्' (Ramayanam) सिनेमात माता सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'रामायणम्' सिनेमाचे निर्माते साई पल्लवीचा (Actress Sai Pallavi) आवाज डब (Dubing) करुन घेण्याचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 'रामायणम्'च्या निर्मात्यांची साई पल्लवीच्या हिंदी शब्दांच्या उच्चारावरुन डोकेदुखी वाढली आहे. अलिकडेच साई पल्लवी आणि बॉलिवूडचा (Bollywood News) मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या लेकासोबतचा 'एक दिन' सिनेमा (Ek Din Movie) आलेला. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Ek Din Box Office Collection) सपशेल आपटला. याच सिनेमातल्या तिच्या हिंदी उच्चारांवरुन तिला ट्रोल केलं जात आहे. त्यामुळेच आता तिचा आगामी सिनेमा 'रामायणम्'चे मेकर्स तिच्या आवाजाचं डबिंग करण्याचा विचार करत आहेत. 

रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका असलेल्या आगामी सिनेमात 'सीता' हे पात्र साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी सध्या 'एक दिन'मधील तिच्या हिंदी उच्चारांमुळे टीकेची धनी ठरली आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात जुनैद खाननंही मुख्य भूमिका साकारली आहे. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. स्पष्टच बोलायचं झालं तर, हा सिनेमा पूर्णपणे आपटला. या पार्श्वभूमीवर, 'रामायणम्'चे निर्माते साई पल्लवीबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

एबीपी न्यूजनं दिलेल्या एका वृत्तानुसार, 'रामायणम्'चे निर्माते साई पल्लवीचे सर्वच्या सर्व डायलॉग्ज डब करून घेण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायणम्'मधील भाषा अधिक अस्सल वाटावी, हे सुनिश्चित करण्यासाठी मेकर्सनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामागे आणखी एक कारण असल्याचं सांगितलं जातंय, ते म्हणजे साई पल्लवी या सिनेमात 'सीता' हे पात्र साकारतेय आणि या पात्रासाठी योग्य हिंदी उच्चार असणं अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

'एक दिन'च्या प्रमोशनदरम्यान साई पल्लवी टीकेची धनी

'एक दिन' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानदरम्यान साई पल्लवीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तिचं हिंदी बोलणं ऐकून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. एका युजरनं ट्विटरवर लिहिलंय की, "भेटा साई पल्लवीला : तिला हिंदीचे अगदी साधे शब्दही बोलता येत नाहीत... आणि आता, ती 'रामायण'मध्ये सीता मातेची भूमिका साकारणार आहे..." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "मला असं वाटतंय की, साई पल्लवीनं हा सिनेमा केवळ 'रामायण'मधील सीतेच्या आगामी भूमिकेसाठी आपले हिंदी उच्चार सुधारण्याच्या उद्देशानंच स्विकारलाय..."

नितेश तिवारींच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित

एका युजरनं तर कमेंट करत नितेश तिवारी यांच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केलेत. त्यानं लिहिलंय की, ""नितेश तिवारी यांनी सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड का केली? अशा व्यक्तीची, जिला धड हिंदीही बोलता येत नाही? ही निवड अत्यंत निराशाजनक आहे." दरम्यान, 'एक दिन' या सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, या सिनेमानं देशांतर्गत केवळ 5.2 कोटी आणि जगभरात 5.47 कोटींची कमाई केली आहे..."

मीडिया रिपोर्टनुसार, साई पल्लवीच्या आधी 4 हजार कोटींच्या 'रामायणम्'मध्ये आलिया भट्ट सीता मातेची भूमिका साकारणार होती. पण, डेट्स नसल्यामुळे आलिया भट्टनं प्रोजेक्ट सोडून दिला. 

'रामायणम्' सिनेमात साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे, तर रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात यश रावणाचं पात्र साकारणार आहे. 'रामायणम् पार्ट 1' या दिवाळीला थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होईल. या सिनेमाचं बजेट अंदाजे 4,000 कोटी रुपये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला, अन् मानधनच घेतो 100 कोटी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget