Ram Setu New Poster : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षयचा हा चित्रपट दिवाळीच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर, आता प्रेक्षकांना घर बसल्या देखील हा चित्रपट पाहता येणार आहे. थिएटरसोबतच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Primeवर देखील प्रदर्शित होणार आहे.


अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) आणि जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकतंच Amazon Primeने त्यांच्या अधिकृत पेजवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत याची माहिती दिली आहे.


पाहा पोस्ट :



‘राम सेतू’च्या या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडीससोबत अभिनेता सत्यदेव कंचरण देखील दिसत आहेत. तिघेही एका भव्य कलाकृतीसमोर उभे आहेत आणि कशाचातरी शोध घेत आहेत. यावेळी अक्षयच्या हातात मशाल दिसत आहे, तर जॅकलिनच्या हातात टॉर्च धरलेली दिसत आहे.


'राम सेतू' हा चित्रपट अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्याने आता चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अक्षयचा हा चित्रपट थिएटरसोबतच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Primeवर देखील प्रदर्शित होणार आहे.  


अक्षयकडे चित्रपटांची रांग!


राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रक्षाबंधन', 'पृथ्वीराज' आणि 'मिशन सिंड्रेला' हे अक्षयचे आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. कोरोनामुळे या चित्रपटांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत.


हेही वाचा :