एक्स्प्लोर

Jai Shree Ram Song : दिवाळीपूर्वीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मधील 'जय श्री राम' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Jai Shree Ram Song : अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत.

Jai Shree Ram Song : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी 'राम सेतू' (Ram Setu) चित्रपटातील 'जय श्री राम' (Jai Shree Ram Song) हे गाणं रिलीज झाले आहे. विक्रम मॉन्ट्रोज यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले, हे गाणे शेखर अस्तित्व यांच्या गीतांसह एक भन्नाट ऊर्जा देणारं भक्ति गीत आहे. चित्रपटाच्या थीमला साजेसं असं हे गाणं आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. हे गाणं म्हणजे या दिवाळीत राम भक्तांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.   

राम-सेतू चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हा या गाण्याचा काही भाग ट्रेलरमध्ये दिसला होता. या चित्रपटाच्या गाण्यात बहुतेक संस्कृत शब्द वापरले आहेत. त्यानुसार हे संगीत फार लाऊड म्युझिकचं आहे. गाण्यातील दृष्यांच्या माध्यमातून अक्षय कुमार राम सेतूचे पुरावे गोळा करण्यात कसा गुंतला आहे आणि ते गोळा करताना त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये त्याला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही साथ आहे.

पाहा व्हिडीओ : 

बॉक्स ऑफिसवर टक्कर

या चित्रपटाची टक्कर अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' या चित्रपटाशी होणार आहे. या संदर्भात फिल्म ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी यापूर्वी सांगितले होते की, संघर्ष असूनही दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, “अजय आणि अक्षय दोघेही ए-लिस्टर आहेत. या दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे दिवाळीमुळे चित्रपटाला चांगली सुरुवात झाली पाहिजे असे मला वाटते, पण शेवटी हे सर्व आशयावर अवलंबून असेल."

ट्रेड एक्सपर्ट गिरीश जोहर यांनी भविष्यवाणी दिली होती की, राम सेतू 16-18 कोटींत ओपनिंग करू शकेल. चित्रपट वितरक अक्षय राठी यांनी सांगितले की, “दिवाळी दोन सुपरस्टार चित्रपटांना सहज सामावून घेऊ शकते. याशिवाय मध्यम आणि लघुपट देखील प्रेक्षकांना भुरळ घालणारा हा काळ आहे. हा असा काळ आहे ज्या दरम्यान लोक आपल्या मित्र परिवाराबरोबर, कुटुंबियांबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेर जातात, चित्रपट पाहतात. त्यामुळे लोकांना चित्रपट निवडण्याबाबत चॉईस दिली पाहिजे."

अक्षयसोबत राम सेतू या चित्रपटात सत्य देव, जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा, नसीर, प्रवेश राणा आणि जेनिफर पिकिनाटो यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन द झोया फॅक्टर आणि तेरे बिन लादेन फेम अभिषेक शर्मा यांनी केले आहे. राम सेतू 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ram Setu Trailer:  प्रतीक्षा संपली! खिलाडी अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चा ट्रेलर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget