एक्स्प्लोर

Rajpal Yadav : तुझे याआधीचे वर्तन आजिबात विश्वासार्ह नाही, तरीही... राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाची शेवटची संधी

Rajpal Yadav Cheque Bounce Case : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून, दोन आठवड्यांची शेवटची मुदत देण्यात आली आहे. कोर्टाने त्याला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Rajpal Yadav Supreme Court Hearing : चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेला बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला (Rajpal Yadav) सुप्रीम कोर्टाकडून काहीसा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राजपाल यादवच्या आजवरच्या वर्तनावर अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सुनावले की, "तुमचे मागील वर्तन अजिबात विश्वासार्ह राहिले नाही, तरीही आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत." 

कोर्टाने राजपाल यादवला त्याचा पासपोर्ट तातडीने सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Rajpal Yadav Passport Surrender : "कोर्टातही ड्रामा सुरु", न्यायमूर्तींची टिप्पणी

सुनावणीदरम्यान राजपाल यादव ऑनलाईन माध्यमातून जोडला गेला होता. त्याच्या वकिलाने कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, "काही मालमत्ता विकून पैशांची सोय केली जात आहे. पुढील दोन आठवड्यांत किमान दोन कोटी रुपयांचा ड्राफ्ट कोर्टात सादर केला जाईल आणि उर्वरित पैशांच्या परताव्याचे अंतिम शेड्युल दिले जाईल."

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी संताप व्यक्त करत म्हटले, "त्याच्या जुन्या वर्तनावरून त्याच्यावर कोणी कसा विश्वास ठेवणार? ते बॉलिवूडमध्ये अभिनय आणि ड्रामा करण्यात पटाईत आहेत आणि कोर्टातही तेच करत आहेत." 

Rajpal Yadav Case History : काय आहे 5 कोटींचे प्रकरण?

कर्ज प्रकरण (2010) : 'अता पता लापता' हा चित्रपट बनवण्यासाठी 'मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' कडून राजपाल यादव, त्याची पत्नी आणि प्रोडक्शन कंपनीने सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 

चेक बाऊन्स : चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर झाल्याने पैसे परत करण्याबाबत करार झाला. मात्र, राजपाल यादवने कंपनीला दिलेले 7 चेक (7 Cheques Bounce) बाऊन्स झाले.

कोर्टाचे निर्णय : 2018 मध्ये ट्रायल कोर्टाने, 2024 मध्ये सत्र न्यायालयाने तर 10 जुलै 2026 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला दोषी ठरवत 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि प्रत्येक केससाठी 1.35 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाला राजपालने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

Supreme Court Rajpal Yadav Case : मागील आदेशाचे पालन नाही

तक्रारदार कंपनीच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, कोर्टाने राजपाल यादवला 9 सप्टेंबरपर्यंत 5 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने अद्याप एक रुपयाही जमा केलेला नाही. असे असतानाही राजपाल यादवच्या वकिलांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत सुप्रीम कोर्टाने त्याला 2 आठवड्यांची शेवटची आणि अंतिम संधी दिली आहे. सध्या सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम दिलासामुळे त्याला तुरुंगात जावे लागणार नाही.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Genelia and Riteish Deshmukh: 'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
Shraddha Kapoor Kolhapur: 'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
'मला आता इथून जाऊ वाटत नाही'; कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यात आलं पाणी, अंबाबाईचंही घेतलं दर्शन
Hanuman Ansh OTT: 'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार
'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार
Ravi Kishan Praises Dada Kondke: रवि किशन यांनी केलं दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं कौतुक; म्हणाले, 'त्यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग अन्...'
रवि किशन यांनी केलं दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं कौतुक; म्हणाले, 'त्यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग अन्...'
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mahim Firing Case: माहीममधील ज्वेलर्स गोळीबारप्रकरणी मोठी अपडेड; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीममधील ज्वेलर्स गोळीबारप्रकरणी मोठी अपडेड; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Yogesh Kadam on Pune Mandar Kiwale Case: मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Embed widget