आमिर-शाहरुखनंतर राजकुमार हिरानी सलमान खानसोबत काम करणार? दिग्दर्शक म्हणाले, 'मला सलमान खानसोबत काम करायला...'
Rajkumar Hirani With Salman khan: राजकुमार हिरानी यांनी सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Rajkumar Hirani With Salman khan Movie: सलमान खान (Salman Khan) सध्या विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यांच्या खात्यामध्ये एकामागोमाग एक सिनेमांची लाइन लागलेली आहे. भाईजान सध्या 'मॉन्सटर' (Monster) या सिनेमासाठी काम करत आहे. यानंतर सलमान खान राज आणि डीके यांच्या सिनेमावर काम करणार आहे. या सगळ्यात राजकुमार हिरानी यांनीही सलमान खानसोबत काम करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला आहे. राजकुमार हिरानी यांनी दोन खानसोबत काम केलेलं आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत 'पी.के' आणि '3 इडियट्स' या सिनेमांसाठी काम केलं आहे. तर, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत त्याने 'Dunki' या चित्रपटासाठी काम केलं होतं. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरम्यान, राजकुमार हिरानी आणि सलमान खान ही जोडी प्रेक्षकांना अद्याप पाहायला मिळालेलं नाही.
राजकुमार हिरानी सलमान खानसोबत काम करणार? (Rajkumar Hirani Wants to Work With Salman Khan)
सलमान खानने 1988 साली 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. त्याने या सिनेइंडस्ट्रीत आपले 38 वर्षे पूर्ण केले आहेत. अशातच राजकुमार हिरानी यांनी सलमान खानसोबत कोलॅबोरेशनवर हिंट दिली आहे. ANIला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही हिंट दिली असल्याची माहिती आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार हिरानी म्हणाले की, 'मला सलमान खानसोबत काम करुन खूप आनंद होईल. असं नाही की आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही. आमची बऱ्याचवेळा भेट झालेली आहे. परंतु, अशी कोणती स्क्रिप्ट मिळाली नाही, की बघून असं वाटेल की आम्ही या स्क्रिप्टवर एकत्र काम करु शकू. जर अशी कोणती स्क्रिप्ट तयार झाली तर, नक्कीच आम्ही दोघं एकत्र काम करु', असं राजकुमार हिरानी म्हणाले.
आमिर खानसोबत राजकुमार हिरानी यांनी दोन सिनेमांसाठी काम केलं होतं. 'पी.के' आणि '3 इडियट्स' या चित्रपटांना प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. '3 इडियट्स' या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? असा प्रश्न सध्या प्रेक्षक आणि चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानसोबत 'डंकी' या सिनेमासाठी काम केलं. परंतु, 'डंकी' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर फारसी जादू चालली नाही. आता राजकुमार हिरानी सलमान खानसोबत आगामी काळात एकाच चित्रपटासाठी काम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सलमान खान सध्या वामसी पैडिपली दिग्दर्शित SVC63 म्हणजेच 'मॉन्सटर' या सिनेमासाठी काम करत आहे. ऑक्टोबर शेवटपर्यंत सलमान खान या प्रोजेक्टमध्ये बिझी राहिल. या सिनेमात सुपरस्टार्सची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. 'मॉन्सटर' या सिनेमासाठी प्रेक्षकवर्ग आतुर आहेत. या सिनेमात सलमान खान नेमकी कोणती भूमिका साकारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























