एक्स्प्लोर

Awarapan 2 OTT: सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर OTTवर रिलीज होणार 'आवारापन 2' ; नेमकं कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

Awarapan 2 OTT Release: 'आवारापन 2' इम्रान हाश्मी अभिनीत हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Emraan Hashmis Awarapan 2 OTT Release: 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अभिनेता इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) बहुचर्चित सिनेमा 'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल 'आवारापन 2' हा चित्रपट रिलीज झाला.   आपल्या उत्तम स्टोरीने 'आवारापन 2' (Awarapan 2) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. 'आवारापन 2' या सिनेमात इम्रान हाश्मीने 'शिवम पंडित' ही भूमिका साकारली होती. त्याने या सिनेमात दमदार अभिनयातून (Entertainment) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कामगिरी केली. दरम्यान, ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही,  त्यांना हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नक्कीच पाहता येईल.   

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'आवारापन 2' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार (Emraan Hashmis Film Awarapan 2 OTT Release)

इम्रान हाश्मी अभिनीत 'आवारापन 2' या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. 'आवारापन 2' या सिनेमाने फॅन्समध्ये एक क्रेझ निर्माण केलं आहे. हा क्रेझ लवकर कमी होणार नाही, हे निश्चित. दरम्यान, यशचा 'टॉक्सिक' रिलीज झाल्यापासून 'आवारापन 2' या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. 'आवारापन 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांना लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे.  

आजकाल लोक सिनेमागृहात चित्रपट पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणं कम्फर्टेबल वाटतं असं सांगतात.  थिएटरमधील प्रदर्शनापूर्वीच त्याच्या डिजिटल हक्कांसाठी डील केली जाते.  सिनेमाच्या पोस्टर्सवर  प्री क्रेडिट सीन्समध्ये ओटीटी पार्टनरचं नाव दाखवलं जातं. असं काहीसं 'आवारापन 2' या सिनेमाच्या बाबतीतही पाहायला मिळालं.  'आवारापन 2' या सिनेमाच्या प्री क्रेडिट सीन्समध्ये  ओटीटी रिलीजची माहितीही देण्यात आली आहे.  त्यामुळे 'आवारापन 2'  हा सिनेमा नेमकं कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान हाश्मी स्टारर 'आवारापन 2' हा सिनेमा  ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होऊ शकतो. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने 'आवारापन 2'  प्रदर्शित होण्यापूर्वीच  त्याचे डिजिटल राइट्स मिळवले होते.  आगामी काळात प्रेक्षकांना हा सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. दरम्यान, 'आवारापन 2' हा सिनेमा नेमकं कोणत्या तारखेला रिलीज होणार?  हे अद्याप उघड होणं बाकी आहे. असं म्हटलं जातं की,  सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला नितिन कक्कर दिग्दर्शित 'आवारापन 2' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो, असा अंदाज आहे. दरम्यान, फिल्ममेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Tejaswini Pandit Post For Parents: 'आई - वडील गेल्यानंतर मुलांना एकट्याने मोठं ...', मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची डोळे पाणावणारी पोस्ट, आई - वडिलांच्या निधनानंतर झाली पोरकी

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sorab Bedi on Relationship: अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
Suchitra Bandekar on Pooja Birari: 'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
'पूजाला म्हटलं ऑडिशन देऊन बघते का? ती म्हणाली..', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ऑडिशनचा किस्सा
MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Embed widget