Film Kabali Producer KP Choudhary Died: दाक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) रजनीकांत (Rajinikanth) यांच्या 'कबाली' (Kabali) चित्रपटाचे निर्माते केपी चौधरी (KP Choudhary) यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यात (Goa News) भाड्यानं राहात होते. त्याच घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. निर्माते केपी चौधरी यांच्या आत्महत्येच्या वृत्तानं अवघी इंडस्ट्री हादरून गेली आहे.  केपी चौधरी यांच्या जाण्यानं दाक्षिणात्य इंडस्ट्रीवर (South Industry) शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामांकीत निर्मात्यांपैकी एक असलेले केपी चौधरी यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे, ज्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 


आर्थिक अडचणींच्या विळख्यात अडकलेले केपी चौधरी 


केपी चौधरी यांनी गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, केपी चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. ते नॉर्थ गोव्यात भाड्याच्या घरात राहत होते. त्याच घरात त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 


कधीकाळी ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक 


केपी चौधरी यांचं संपूर्ण नाव कृष्णा प्रसाद चौधरी. 2023 मध्ये ड्रग्ज प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेनंतर केपी चौधरी यांचं आयुष्य पालटलं आणि इंडस्ट्रीतला त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला. त्यानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्याचा विचार करून ते गोव्याला शिफ्ट झाले. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून ते गोव्यातच राहात होते. 


एका तेलगू वेब साईटनं दिलेल्या वृ्तानुसार, पोलिसांनी केपी चौधरी यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. मूळचे खम्मम जिल्ह्यातील असेलेल्या केपी चौधरी यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती आणि डिस्ट्रीब्यूट केले आहेत. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर 'कबाली' चित्रपटाचीही निर्मिती केली होती. तमिळ चित्रपटांमधील भूमिकांव्यतिरिक्त, त्यांनी 'गब्बर सिंह', 'सीथम्मा वकित्लो सिरीमल्ले चेट्टू' आणि 'अर्जुन सुरवरम' यासह अनेक हिट तेलुगू चित्रपट  डिस्ट्रीब्यूट केले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Upasana Singh Casting Couch Experience: "मी फक्त 17 वर्षांची होते, त्यावेळी दिग्दर्शकानं मला रात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा अनुभव