Beed: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे (Shrihari Kale) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी काळे हे मित्रांसह लग्न समारंभाहून परतत होते. माजलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर ते काही क्षणांसाठी थांबले असताना एका वेगवान वाहनाने त्यांना धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा
अज्ञात वाहनाच्या धडकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे यांचे अपघाती निधन झाले आहे. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. श्रीहरी काळे आपल्या मित्रांसह लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना ही घटना घडली आहे. श्रीहरी काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार गटात कार्यरत आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहेत. श्रीहरी काळे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि परिचितांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर झालेली महिलेची हत्येबाबत नवी माहिती समोर आली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. मयत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा लावल्यानंतर आरोपीने महिलेची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते. सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला हात उसने पैसे दिल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर सीमाने पैशासाठी तगादा लावला होता. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा सीमा कांबळने आरोपी राहुल भिंगारकर मागे लावल्याची प्राथमिक माहिती आहे. (Ambernath Woman Murder)
हेही वाचा: