एक्स्प्लोर

Raja Shivaji Song Out:'राजा शिवाजी'चं पहिलंच गाणं रिलीज; अजय-अतुलचं 'छत्रपती' अँथम ऐकून छाती गर्वानं फुलून जाईल

प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी ऊर्जा, अभिमान आणि एकात्मता ही ‘राजा शिवाजी’च्या भव्यतेची साक्ष देते.

Raja Shivaji Chhatrapati Anthem Song Out: भारतीय इतिहासाच्या तेजस्वी वारश्याला भव्य आणि भावपूर्ण स्वरूपात साकार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम "छत्रपती" आज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहे. 'जिओ स्टुडिओज्' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने, देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडियाच्या माध्यमातून सादर झालेले हे गीत प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय संगीतमय अनुभव ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी वारश्याला समर्पित असलेले हे गीत, केवळ एक गाणे नसून शौर्य, अभिमान आणि इतिहासाचा भव्य संगम आहे.

दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड

प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या मराठी आणि हिंदी भाषिय आवृत्ती साठी अजय गोगावले यांच्या दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हिंदी गाणं शब्दबद्ध केलं आहे नामांकित गीतकार मनोज मुंतशिर यांनी, जे आजच्या भारतीय अस्मितेचं एक प्रतिक ठरणार आहे. तब्बल ८० गायकांच्या समूहाने साकारलेले हे गीत श्रवणीय भव्यतेचा उच्चांक गाठते. गीतातील प्रत्येक स्वर, प्रत्येक लय आणि प्रत्येक उंचावणारा सूर हा स्वराज्याच्या अभिमानाची आणि सामूहिक चेतनेची जाणीव करून देतो. राजा शिवाजी अँथम "छत्रपती" हे गीत ऐकताना केवळ संगीताचा अनुभव येत नाही, तर इतिहासातील एका महान क्षणाची पुनर्भेट घडते, आपल्या राजाबद्दल असलेला आदर, प्रेम आणि भावूक करून जाते.

राजाच्या पराक्रमाचा गौरव

भव्य दृश्यरचना आणि खोल भावनिक गाभा यांचा संगम साधणारे हे गीत केवळ नेत्रसुखद नसून अंतर्मनाला स्पर्श करणारे आहे. दमदार ताल, प्रभावी शब्दरचना आणि भावनांच्या टप्प्याटप्प्याने उंचावत जाणाऱ्या प्रवाहामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात अभिमानाची भावना जागवते. हे गाणे केवळ एका राजाच्या पराक्रमाचा गौरव करत नाही, तर स्वराज्याच्या उदयाची, लोकांच्या जागृतीची आणि सामूहिक अस्मितेच्या उभारणीची कहाणी देखील सांगते.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी या गीताचे नृत्यदिग्दर्शन केले असून, प्रत्येक दृश्यातून गीतातील भावविश्व अधिक प्रभावीपणे उलगडते. दृश्य आणि संगीत यांचा सुंदर संगम साधत, हे गीत प्रेक्षकांसमोर एक सजीव, उर्जावान आणि प्रेरणादायी अनुभव साकारते. प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी ऊर्जा, अभिमान आणि एकात्मता ही ‘राजा शिवाजी’च्या भव्यतेची साक्ष देते.

 

अजय अतुल म्हणाले..

या गीताबाबत बोलताना संगीतकार अजय-अतुल म्हणतात की , “हे गाणे फक्त भव्य असावे इतकेच आमचे ध्येय नव्हते, तर त्यात भावना, प्रामाणिकपणा आणि आदराची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे होते. प्रत्येक सूरामध्ये एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे त्या वारशाचा सन्मान राखण्याची. आम्ही या गीतामधून श्रोत्यांच्या मनात अभिमानाची आणि प्रेरणेची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. जर या गीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले, तर ते आमच्यासाठी यश आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे गीत त्यांच्या मनात कायम राहावं, हीच खरी आपल्या महाराजांसाठी मानवंदना ठरेल.

तगडी स्टारकास्ट, कधी होणार रिलीज?

रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. 

'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरव, त्यातील भावगर्भता आणि भव्यता यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे. सध्या राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाले असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अँथमच्या दमदार सुरुवातीने ‘राजा शिवाजी’च्या भव्य विश्वाची नांदी झाली असून, आगामी काळात हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक सांस्कृतिक सोहळा म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Hanchanale Baby Girl: 'तुझ्यात जीव रंगला' फेम 'राणा दा'च्या भावाला झाली लेक; 9 दिवसांनी शेअर केली पोस्ट, लेकीला दिलं खास वचन
'तुझ्यात जीव रंगला' फेम 'राणा दा'च्या भावाला झाली लेक; 9 दिवसांनी शेअर केली पोस्ट, लेकीला दिलं खास वचन
Rashmika Mandanna On Vijay Deverakonda Cares: मासिक पाळीच्या वेदानादायी दिवसांत माझा नवरा काळजी घेतो, पुरुषांकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा ठेवू शकता?; रश्मिका मंदनाच्या वक्तव्याची चर्चा
मासिक पाळीच्या वेदानादायी दिवसांत माझा नवरा...'; रश्मिका मंदनाच्या वक्तव्याची चर्चा
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Ashok Saraf Lamborgini Car Video Viral: अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
IND vs NZ 4th T20 : भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
Embed widget