एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’चा भगवा बॉक्स ऑफिसवर दिमाखात फडकतोय, नवव्या दिवशी मुसंडी मारत जबरदस्त कमाई, अर्ध्याहून अधिक बजेट काढलं

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट दिसून येत असली तरी वीकेंडला मुसंडी मारून परत 'राजा शिवाजी' ने (Raja Shivaji)  कमाईचा नवा आकडा गाठलाय.

Raja Shivaji Box office collection: राजा शिवाजीचा बॉक्स ऑफिसवरील विजयाचा झेंडा दिवसेंदिवस अधिक उंचावताना दिसत आहे. नवव्या दिवशी चित्रपटाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत कोट्यवधींची कमाई केली असून, अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाने आपल्या एकूण बजेटपैकी अर्ध्याहून अधिक रक्कम वसूल केलीय. 100 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतभरात 76.42 कोटीं  रुपयांची कमाई केलीय. 'राजा शिवाजी' या रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनित चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई (Box Office Collection) करत दमदार सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या शौर्य पटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट दिसून येत असली तरी वीकेंडला मुसंडी मारून परत 'राजा शिवाजी' ने (Raja Shivaji)  कमाईचा नवा आकडा गाठलाय.

दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट, अजय अतुलचे अंगावर शहारे आणणार संगीत अशा अनेक कारणांमुळे आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या रांगेत दुसऱ्या स्थानावर ' राजा शिवाजी ' पोहोचलाय . केवळ वीकेंडलाच नाही तर वीकडेजमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. 

दुसऱ्या शनिवारी ‘राजा शिवाजी’ची मुसंडी

दुसऱ्या आठवड्यात अनेक स्क्रीन आणि शो कमी झाल्यानंतर शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत अपेक्षित घट दिसून आली होती. मात्र शनिवारी चित्रपटाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं. सकाळच्या शोमध्ये 23 टक्के ऑक्युपन्सी नोंदवणाऱ्या चित्रपटाने दुपारच्या शोमध्ये थेट 40 टक्क्यांपर्यंत झेप घेतली. संध्याकाळच्या शोमध्ये ही संख्या 46 टक्क्यांपर्यंत पोहोचली, तर रात्रीच्या शोमध्ये ऑक्युपन्सी 50 टक्क्यांहून अधिक गेल्याची माहिती समोर आली आहे. 

9 दिवसांत किती कमाई?

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, आतापर्यंत ' राजा शिवाजी' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 64.43 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 76.42 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

पहिला आठवडा 52.65 कोटी

दिवस 8 – 3.20कोटी
दिवस 9 – 5.60 कोटी
एकूण – 76.42 कोटी (ग्रॉस )

मराठी चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

सध्या ‘राजा शिवाजी’ हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बाई पण भारी देवा या चित्रपटाने 76.28 कोटींची कमाई केली होती. ‘राजा शिवाजी’ने धडाक्यात हा विक्रम मोडला आहे.  

1. सैराट – 90 कोटी
2. बाई पण भारी देवा – 76.28 कोटी
3. राजा शिवाजी – 64.43 कोटी (9 दिवस)
4. वेड – 61.2 कोटी
5. नटसम्राट – 42 कोटी
6. पावनखिंड – 37.72 कोटी
7. लई भारी – 37 कोटी
8. कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
9. ठाकरे – 31.6 कोटी
10. टाइमपास – 30 कोटी

हेही वाचा:

Abhishek Bachchan on Raja Shivaji VFX Trolling:‘राजा शिवाजी’चे VFX पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया, अभिषेक बच्चनचे सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget