Raid 2 Box Office Day 20: तिसऱ्या मंगळवारीही 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'छावा'ला मागे टाकणार?
Raid 2 Box Office Day 20: 'रेड 2' ला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट आणखी एक रेकॉर्ड मोडणार आहे.

Raid 2 Box Office Day 20: अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं 150 कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश केला आहे. 'रेड 2' च्या कमाईत अजूनही चांगली वाढ दिसून येत आहे. हा चित्रपट लवकरच टोटल धमालचा विक्रम मोडणार आहे. टोटल धमालचं लाईफटाईम कलेक्शन 155.67 कोटी रुपये आहे.
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅक्निल्कच्या मते, 'रेड 2'नं तिसऱ्या मंगळवारी 2.15 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या तिसऱ्या मंगळवारीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. पण जर चित्रपटानं 2.15 कोटी रुपये कमावले तर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 153.25 कोटी रुपये होईल.
आतापर्यंतचं 'रेड 2'चं कलेक्शन किती?
'रेड 2'ला 19.25 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 12 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. या चित्रपटानं 18 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटानं 22 कोटी रुपयांचं शानदार कलेक्शन केलं. यानंतर चित्रपटाच्या कमाईत मात्र कमालीची घट दिसून आली.
View this post on Instagram
पाचव्या दिवशी या चित्रपटानं 7.5 कोटी रुपये कमावले. चित्रपटानं सहाव्या दिवशी 7 कोटी, सातव्या दिवशी 4.75 कोटी आणि आठव्या दिवशी 5.25 कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 95.75 कोटी रुपये कमावले.
या चित्रपटानं नवव्या दिवशी 5 कोटी, दहाव्या दिवशी 8.25 कोटी, अकराव्या दिवशी 11.75 कोटी, बाराव्या दिवशी 4.85 कोटी, तेराव्या दिवशी 4.5 कोटी, बाराव्या दिवशी 3.25 कोटी आणि पंधराव्या दिवशी 3 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 40.6 कोटी रुपये कमावले.
चित्रपटानं 16 व्या दिवशी 3 कोटी रुपये, सतराव्या दिवशी 4.25 कोटी रुपये, अठराव्या दिवशी 5.65 कोटी रुपये आणि 19 व्या दिवशी 1.85 कोटी रुपये कमावले. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















