PVR-INOX Future Plans: भारतीय मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर (PVR) आयनॉक्स लिमिटेड, पीव्हीआर सिनेमा म्हणूनही ओळखली जाते. या पीव्हिआरने नवीन आर्थिक वर्षात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, PVR ने त्यांच्या 70 स्क्रीन बंद करणार आहे. आता सगळ्यांना असा प्रश्न पडलाय की आपला बिझनेस कमी करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण कंपनीकडून हा निर्णय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. PVR ने केवळ 70 मल्टिप्लेक्स बंद करण्याचा निर्णय घेतला नाही तर 120 नवीन मल्टिप्लेक्स उघडण्याचंही प्लॅनिंग केलं आहे.
मिंटच्या वृत्तानुसार, खरं तर कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे आकडे सादर केले आहेत. ज्यामध्ये कंपनीला एकूण 130 कोटी रुपयांचा तोटा झालाय. यानंतर कंपनीने नवीन धोरण अवलंबण्याचे ठरवले. याअंतर्गत ज्या चित्रपटगृहांचे प्रदर्शन अत्यंत निकृष्ट होते तेच चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर, कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आणि लॉकडाऊनमुळे लोकांनी थिएटरमध्ये जाणं बंद केलं होतं. अशा परिस्थितीत, OTT प्लॅटफॉर्म देखील लोकांसाठी मनोरंजनाचे एक मजबूत माध्यम म्हणून उदयास आले. यामुळे पीव्हीआरचेही नुकसान झाले. पण यावर मात करण्यासाठी पीव्हीआरने आता एक नवी योजना आखली आहे.
कंपनीचा मास्टर प्लॅन काय ?
आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीशी संबंधित कंपनीने सादर केलेल्या डेटामध्ये कंपनीला 130 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात 85 चित्रपटगृहे बंद केली होती, तर आता कंपनी 2024-25 या आर्थिक वर्षात आणखी 70 चित्रपटगृहे बंद करणार आहे. कंपनीच्या आर्थिक नियोजनाअंतर्गत कंपनीने अलीकडेच आपल्या घोषणेमध्ये हे सांगितले. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की, कंपनी दक्षिण भारतात 120 नवीन चित्रपटगृहे सुरू करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच दक्षिण भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न असून ज्याचा कंपनीला फायदा होऊ शकतो.
कंपनीने का घेतला असा निर्णय?
कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांच्या थिएटर्समधून जास्तीत जास्त परतावा मिळवायचा आहे.म्हणजेच कंपनीच्या संसाधनांचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्याचे हे धोरण आहे. कंपनीला हे कॅपिटल लाईट मॉडेल अंतर्गत करायचे आहे. कॅपिटल लाईट मॉडेल असे मॉडेल आहे ज्या अंतर्गत कंपनी गुंतवलेल्या भांडवलाची रक्कम कमी करते. याशिवाय गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीचा खर्चही 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.