Google Wallet App : डिजिटल वॉलेटचा वापर करणार असाल आणि त्यासाठी जर गुगल वॉलेट अॅप डाऊनलोड करण्याचा तुमचा विचार असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता Android वापरकर्त्यांसाठी मोठी माहिती समोर आली असून गुगल वॉलेट अॅप हे काही अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काम करणार नाही.  


ॲप कोणत्या अॅन्ड्रॉईडमध्ये काम करणार नाही? 


गुगलने काही जुन्या स्मार्टफोनचे अपडेट्स थांबवले आहेत. अशा परिस्थितीत जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 9 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जन असेल, तर तुम्ही Google Wallet ॲप वापरू शकणार नाही. कंपनीने सिक्युरिटी अपडेट्स लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम जास्त वापरकर्त्यांवर होणार नाही, अगदी कमी वापरकर्त्यांसाठी ही सुविधा बंद होईल अशी कंपनीची आशा आहे. युजर्सच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.


Android 9 साठी गुगलचे अपडेट्स बंद होणार


Android 9 किंवा त्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये सुरक्षिततेशी संबंधित काही समस्या आहे. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीही थोडे सावध राहावे. आता गुगल वॉलेटमध्ये वापरकर्त्याची बरीच वैयक्तिक माहिती संग्रहित आहे. त्यात कार्डच्या तपशीलासह सर्व माहिती असते. हेच कारण आहे की या यूजर्सना Google कडून त्याचे अपडेट दिले जाणार नाही.


तुम्ही Google Wallet कसे वापरू शकता?


Google Wallet वापरण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येथून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळण्यास सुरुवात होईल. तुम्हाला स्क्रीनवर सर्व सूचना मिळत राहतील. या ठिकाणी तुम्ही पेमेंटसाठी कार्ड जोडू शकता. यानंतर हे ॲप Google Pay शी जोडले जाईल आणि तुम्ही सहज पेमेंट करू शकाल.


यूजर्स गुगल वॉलेट हे ॲप डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड स्टोअर करण्यासाठी वापरू शकतात. हे एक डिजिटल वॉलेट असून अँड्रॉईड वापरकर्त्यांना ते वापरता येणार आहे. गुगल वॉलेट हे ॲप गुगल पे ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. गुगल पेचा वापर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर आणि वेगवेगळी बील भरण्यासाठी करता येतो. दुसरीकडे गुगल वॉलेट हे ॲप नॉन पेमेंट ॲप आहे. 


ही बातमी वाचा: