Ankita Lokhande Viral Video :  अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही नुकतील स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या भेटील आली होती. या सिनेमामध्ये अंकिताने सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस उतरली. त्यानंतर अंकिता सोशल मीडियावरही बरीच चर्चेत राहिली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अंकिता चांगलीच चर्चेत आली आहे. अंकिताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 


अंकिताच्या या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावरही बरचं ट्रोल केलंय. तसेच तिच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळालंय. अंकिता शोर्ट्स घालून मंदिरात गेली होती. ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा ती पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर आली. तेव्हा ती कॅमेऱ्यामध्ये म्हणाली मी मंदिरातून आली असल्याचं म्हणाली आहे. त्यामुळे तिच्या पेहरावारुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. 






नेटकऱ्यांकडून अंकिता ट्रोल


दरम्यान अंकिताचा हा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. ‘थोडी तरी लाज वाटली पाहिजे, मंदिरात असे कपडे कोण घातलं?’ अशी कमेंट एक युजरने केलीये.  ‘ही आधीपासूनच वेडी होती. बिग बॉसमध्ये जाऊन आल्यानंतर तिच्या डोक्यावर आणखी परिणाम झाला आहे’, अंकिताला मानसिक उपचाराची गरज आहे, हल्ली ती वेड्यासारखीच वागताना दिसतेय’, अशा आशयाच्या कमेंट्स अंकिताच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. अंकिताने ओव्हर-साइज्ड टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. तसेच या व्हिडिओमध्ये तू स्वत:हूनच मंदिरात घेल्याचं सांगत आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं.                                                                                    






ही बातमी वाचा : 


Cannes Film Festival 2024 : मराठी पाऊल पडते पुढे! कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट' फेम अभिनेत्रीला मिळाला बहुमान, 'चलो कान्स' म्हणत शेअर केला फोटो