Pushpa 2 : 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa -2) या चित्रपटाची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यातच आता या सिनेमाबाबत एक नवी अपडेट समोर आलीये. नुकतच निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे 'द कपल सॉन्ग' चे टीझरचे अनावरण केले आहे. ज्याचे शीर्षक 'अंगारों', 'सूसेकी', 'सूदाना', 'कंडालो' आहे. ', 'नोडोका' आणि 'AAGUNER' अनुक्रमे हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे गाणं येणार  आहे. हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी आणि  गायिका श्रेया घोषाल यांनी मिळून तयार केलं आहे. 


'द कपल सॉन्ग' ची एक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. यामुळे हे सिद्ध केले आहे की चाहते एका संगीतमय कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत.  श्रेया घोषालच्याआवाजासह DSP ने संगीतबद्ध केलेलं हे डायनॅमिक गाणं असणार आहे. 'हिटमेकर अशी ख्याती असलेला डीएसपी आपल्या कामाने भारतीय चित्रपटसृष्टीत बेंचमार्क करत आहे . म्हणून 'पुष्पा 2: द रुल' साठी सगळेच उत्सुक आहेत.



6 भाषांमध्ये गाणे झालं रिलीज


'पुष्पा 2' मधील गाणं  'पुष्पा-पुष्पा' 6 भाषांमध्ये रिलीज झाले आहे. तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जनसाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास यांसारख्या लोकप्रिय गायकांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे. 


'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार  आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.                                                    






ही बातमी वाचा : 


Boney Kapoor : अक्षय कुमारवर मात करत नोएडा फिल्म सिटीसाठी बोली बोनी कपूर यांनी जिंकली, 230 एकरमध्ये तयार होणार भव्य फिल्मसिटी