Boney Kapoor :  चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या नेतृत्वाखाली ग्रेटर नोएडामध्ये फिल्म सिटी बनवण्याची तयारी आता जोरात सुरू होणार आहे. बोनी कपूरच्या कन्सोर्टियमने यमुना एक्स्प्रेस वेवर 230 एकरमध्ये पसरलेल्या फिल्म सिटीचे संचालन करण्याचा परवाना जिंकला आहे. नोएडा फिल्म सिटीच्या बांधकामासाठी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि निर्माता भूषण कुमार यांना बोनी कपूर यांनी मागे टाकले. या फिल्म सिटीच्या बांधकामासाठी बोनी कपूरच्या कन्सोर्टियम, बेबू प्रोजेक्ट्स एलएलपीने अक्षय कुमार आणि केसी बोकाडिया यांच्या कंपनीपेक्षा जास्त बोली लावून टेंडर जिंकले होते. 


फिल्म सिटी यमुना एक्सप्रेसवेच्या बाजूने 230 एकरमध्ये पसरलेली आहे.  त्यातच आता हे स्पष्ट झाले आहे की, यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणारी ही फिल्म सिटी पुढील 99 वर्षे बोनी कपूर यांच्या कंपनीद्वारे चालविली जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, फिल्म सिटीमध्ये एक फिल्म युनिव्हर्सिटी, सिनेमा म्युझियम आणि हेलिपॅड यासह इतर सुविधा असतील. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ही फिल्म सिटी आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 6 किमी अंतरावर आहे.


या कंपन्यांनी जूनमध्ये दिले होते टेंडर


सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज), सुपरसोनिक टेक्नोबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड (दिनेश विजनची मॅडॉक फिल्म्स, अक्षय कुमारची केप ऑफ गुड फिल्म्स एलएलपी, आणि इतर), बेव्यू प्रोजेक्ट्स एलएलपी (बोनी कपूर, रिअल इस्टेट कंपनी भुतानी ग्रुप आणि नोएडा सायबर पार्क) , आणि 4 Lions Films Pvt Ltd (चित्रपट निर्माते के.सी. बोकाडिया आणि इतरांच्या पाठिंब्याने) यांनी ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी त्यांचे सादरीकरण जूनमध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले होते.Bayview Projects LLP आता जमीन ताब्यात घेण्यासाठी यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणासोबत जूनमध्ये सवलत करारावर स्वाक्षरी करेल. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी असेल.


अशी असणार फिल्म सिटी


येथे पसरलेल्या 230 एकरांपैकी 155 एकर जागा केवळ चित्रपट उद्योगासाठी राखीव आहे ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 एकर व्यावसायिक विकासासाठी राखीव असणार आहे. या फिल्मसिटीमध्ये सिनेमा म्युझियम, फिल्म युनिव्हर्सिटी आणि हेलिपॅड अशा इतर सुविधा असतील.


ही बातमी वाचा : 


Duniyadari Movie : ''तेरी मेरी यारी, पुन्हा पाहूया दुनियादारी', 11 वर्षांनी श्रेयस, मिनू, दिग्या सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला