Gujrat, Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (दि.25) घडलीये. दरम्यान आग कशामुळे लागली याबाबत आम्ही तपास करत असल्याचे राजकोटच्या पोलीस कमिशनर यांनी सांगितले आहे. शिवाय, शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याचे आदेशही पोलीस कमिश्नरांनी दिली आहेत.
गुजरातमध्ये आगीचे तांडव, गेम झोन जळून खाक
गेमझोनला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला असला तरी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण गेम झोन जळून खाक झाले आहे. पोलीस कमिशनर राजीव भार्गव आणि जिल्हाधिकारी आनंदर पटेल घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेम झोनपासून 5 किलोमीटर दूरपर्यंत आगीचे लोट
कालावड रोडजवळील टीआरपी गेम झोनला आग लागल्याची ही घटना आहे. आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. गेम झोनच्या आगीचे लोट 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर पसरले आहेत. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल काय म्हणाले?
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेबाबत ट्वीटरवरुन भाष्य केलं आहे. "राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याची घटना घडलीये. मी प्रशासनाला बचाव कार्यासंबंधी सर्व सूचना दिल्या आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असं भुपेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आरए जोबन म्हणाले, "आम्ही मृतांची नेमकी संख्या सांगू शकत नाही. आम्ही दोन्ही बाजूंनी मृतदेहखाली आणत आहोत. शोध मोहीम सुरू आहे."
इतर महत्वाच्या बातम्या
Prakash Shendge on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, प्रकाश शेंडगेंचा इशारा