मुंबई : मुंबईतील कुर्ला बेस्ट बसच्या (Kurla Best Bus Accident) अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातात भरधाव बसने अनेकांना चिरडलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांद्वारे संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी बसचा चालक संजय मोरे यास बोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याच अपघाताचं संभाव्य कारण समोर आलं आहे.


अपघाताचं नेमकं कारण काय?


या दुर्घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनीच हा अपघात नेमका का झाला, याबाबत माहिती दिली आहे. "कुर्ला स्टेशनहून एक बस निघाली होती. ही बस प्रवाशांनी भरलेली होती. त्या बसचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे चालक घाबरला. तो घाबरल्यामुळे त्याने ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिला. त्यामुळेच बस जास्त वेगात धावली. कुर्ला स्टेशन ते आंबेडकर चौकापर्यंत बस सर्वांना चिरडत आली. यात 26 जण जखमी आहेत. बाबा रुग्णालयात सर्वांवर उपचार करण्याची सोय नसल्यामुळे उर्वरित रुग्णांना सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजेवाडी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे," अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली आहे.


कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे


विजय विष्णू गायकवाड(७०) 


आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९)


अनम शेख(२०)


कणीस फातिमा गुलाम कादरी(५५)


शिवम कश्यप(१८)


चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.


हेही वाचा :


Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं पादचाऱ्यांना चिरडलं; आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, तर 30 ते 35 जण जखमी


आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!