Weather update: गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. आज धुळ्यात तापमान 4 अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिक गारठल्याचं दिसलं. ही यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद आहे. नाशिकमध्येही तापमान घटलं असून निफाडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाचा पारा होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तापमानात कमालीची घट दिसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फिंगल चक्रीवादळाने राज्यातून थंडी गायब झाली होती. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घट झाली आहे. राज्यात आज कुठे काय तापमान नोंदवले गेले? पुढील पाच दिवस कसे राहणार? हवामान विभागाचा अंदाज काय? पाहूया..
धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद
राज्यात आज बहुतांश ठिकाणी तापमान घटले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व किनारपट्टी भागातही तापमानात घट झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज मंगळवारी (10 डिसेंबर) धुळ्यात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. धुळे जिल्हा आज 4 अंश सेल्सिअसवर गेला होता. वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. प्रशासनाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केलं आहे.
नाशिकचा पारा गेला 8 अंशांवर
उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत गारठा वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
रायगडमध्ये तापमान 18 अंशांवरून थेट 12 अंशावर
फेंगल चक्रीवादळाच्या चाहुलीनंतर रायगड मध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता कडाक्याची थंडी पुन्हा सुरू झाली असून 18 अंश सेल्सिअस वर असणारे रायगडचे तापमान थेट 12 अंशावर घसरले आहे. हवेतील आर्द्रता कमी झाली असून कोरडेपणा वाढल्याने रायगड करांना स्वेटर आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.