Priyanka Chopra, Nick Jonas : प्रियांकाचे नवे फोटो पाहून पती निकही झाला फिदा! कमेंट करत म्हणाला...
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने गोल्फ खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या क्रॉप टॉप आणि फिट स्कर्टमध्ये दिसत आहे.
Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. ही अभिनेत्री सध्या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राने गोल्फ खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या क्रॉप टॉप आणि फिट स्कर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीसोबत तिचा पती निक जोनासही (Nick Jonas) मित्रांसोबत गोल्फ खेळण्यासाठी आला होता. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
प्रियांका चोप्राने गोल्फ मैदानातील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या सनग्लासेस घालून केस बांधताना दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहून पती निक जोनासही घायाळ झाला आहे. या फोटोंवर कमेंट करताना निक जोनासने लिहिले की, ‘तू इतकी हॉट का आहेस?’ फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजचा दिवस चांगला होता.’
पाहा पोस्ट :
लेकीचं नाव ऐकलंत का?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास काही महिन्यांपूर्वीच सरोगसीद्वारे छोट्या मुलीचे पालक बनले. प्रियांकाने अद्याप आपल्या मुलीची झलक जगाला दाखवलेली नाही. प्रियांका आणि निकच्या मुलीच्या नावावरून बराच सस्पेन्स निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाने आता आपल्या मुलीचे नाव ठरवले आहे. प्रियांका आणि निकच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे असणार आहे. प्रियांकाच्या मुलीच्या नावाचे कनेक्शन चोप्रा आणि जोनास कुटुंबाशी आहे. मालती हे नाव प्रियांकाची आई मधुमालती चोप्रा यांच्या नावावरून प्रेरित आहे. तर, मेरी हे नाव निकची आई डेनिस मेरी मिलर जोनास यांच्या नावातून घेतले आहे.
मुलीच्या जन्मानंतर प्रियांकाने काही काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करायला आणि आपल्या अपडेट्स द्यायला सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. सध्या प्रियांका आणि निक जोनास दोघेही सोशल मीडियावर भरपूर पोस्ट करत आहेत.
हेही वाचा :