Priyanka Chopra, Nick Jonas : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका तिच्या अभिनानं प्रेक्षकांची मनं जिंकते. सध्या प्रियांका तिच्या कुटुंबासोबत लॉस एंजेलिस येथे राहात आहे. प्रियांकानं महाशिवरात्री निमित्त तिच्या लॉस एंजेलिसमधील घरामध्ये खास पूजेचे आयोजन केले.  या पूजेचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


इन्स्टाग्रामवर स्टोरीवर प्रियांकानं फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाचा पती निक जोनास (Nick Jonas), आणि तिची स्टायलिस्ट दिव्या ज्योती दिसत आहे. प्रियांकानं या फोटोला कॅप्शन दिले, 'हर हर महादेव सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. '  या फोटमध्ये निक आणि प्रियांका प्रार्थना करताना दिसत आहेत. यावेळी प्रियांकानं बेबी पिंक कलरचा फ्लोअर प्रिंट ड्रेस आणि डायमंड रिंग असा लूक केला होता. 




काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निक हे आई-वडील  झाले आहेत. याबद्दलची माहिती प्रियांकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक झाले. प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी एक पोस्ट केली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. 






संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha