Happy Birthday Tiger Shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) चा आज 32 वा वाढदिवस आहे. त्याचे चाहते तसेच बॉलिवूडमधील सेलिब्रीटी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. टायगर त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. त्याचा वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...
टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी झाला. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की टायगरचे खरे नाव हेमंत श्रॉफ असं आहे. टायगर लहान होता तेव्हा त्याच्या वडीलांनी त्याचं टोपण नाव टायगर असं ठेवलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी टायगरनं त्याचं नाव बदललं.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी टायगरच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधलं पण काहींनी त्याच्या लूकला ट्रोल केलं. अनेकांनी त्याला गर्ल लूक आणि पिंक लिप्स लूक असं म्हणत ट्रोल केले होते. पण टायगरनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.
टायगर हा तायक्वॉन्डोमध्ये ब्लॅक बेल्ट विनर आहे. तसेच त्यानं मार्शल आर्टचं देखील ट्रेनिंग घेतलं आहे. त्याच्या बाघी, वॉर, स्टूडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटांमधील टायगरच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक वेळा टायगरचे नाव अभिनेत्री दिशा पाटणीसोबत जोडले जाते. पण टायगरनं त्याच्या आणि दिशाच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती त्याच्या चाहत्यांना दिलेली नाही. लवकरच टायगरचे हिरोपंती, गणपत आणि बडे मिया छोटो मिया हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- 'धड़कनें बढ़ रही हैं, चिंता हो रही है'; अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमागचं हे आहे सत्य
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha