IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज अर्थात IPCC च्या अहवालातून समोर आले आहे. IPCC चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे, या अहवालातून काही धक्कादायक निरीक्षणे समोर आली आहेत. यामध्ये मुंबईसाठी देखील मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं या अहवालात सांगितले आहे.
मुंबईबद्दल नेमकं काय सांगण्यात आलंय
- मुंबईत समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होणार
- 2050 सालापर्यंत होणारे नुकसान सुमारे 49 ते 50 बिलियन डॉलर असण्याचा अंदाज
- 2070 सालापर्यंत त्यामध्ये 2.9 पटीनं वाढ होण्याची शक्यता
- ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचा वेग असाच कायम राहिल्यास एकट्या मुंबईत 2050 सालापर्यंत 162 बिलियन डॉलर नुकसान होण्याचा अंदाज, म्हणजे अदानी आणि अंबानी यांची संपत्ती एकत्र केल्यास तेवढं नुकसान होण्याचा अंदाज
मुंबई कोस्टल रोडसंदर्भात देखील आयपीसीसीच्या अहवालात गंभीर ताशेरे ओडण्यात आले आहेत.
कोस्टल रोडमुळे भरती-ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीवर जगणाऱ्या स्थानिक जनजीवनाला धोका
मुंबईसह उपनगरातील मोठ्या लोकसंख्येला पुराचा मोठा धोका
गरीब कुटुंबाला पुराच्या धोक्यापासून वाचायचे असल्यास घराची दुरुस्ती करावी लागते
श्रीमंतांच्या तुलनेत उत्पन्नातील मोठा हिस्सा यावर खर्च करावा लागतो
पुरामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक नुकसान होणाऱ्या सर्वाधिक मोठ्या 20 शहरांमध्ये आशियातील मुंबईसह 13 शहरांचा समावेश
सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत आहे. याचा फटाका सर्वच क्षेत्रांना सहन करावा लागत आहे. हवामान बदलाचा जगाला नेमका कसा फटका बसू शकतो याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तापमानात साधारणत: 1 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होईल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशियायी देशांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तांदूळ आणि मका उत्पादन घटणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे. त्याचा भारतातील सुमारे साडेचार कोटी नागरिकांना धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. कृषी उत्पन्नात घट होणार असून, पुराचा धोका वाढण्याची शक्यता या अहवालात सांगण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: