Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. रणवीर चाहता वर्ग मोठा आहे.  अनेकवेळा चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. नुकताच रणवीर त्याच्या एका फॅनला भेटला. त्या फॅननं रणवीरसाठी एक खास गोष्ट केली होती. 


रणवीरच्या एका चाहत्यानं पाठीवर रणवीरचा टॅटू काढला होता. त्या रणवीरच्या फॅननं त्याला टॅटू दाखवला. तो व्यक्ती रणवीरला म्हणाला, 'मला तुला भेटायची इच्छा होती.' त्यावर रणवीरनं उत्तर दिलं, 'चल भेटलो आपण. ' त्यानंतर रणवीरनं त्याच्यासोबत फोटो काढला.  सध्या रणवीरच्या या फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करत अनेकांनी या रणवीरच्या फॅनचं कौतुक केलं आहे.





रणवीरचा लवकरच जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील रणवीर प्रमुख भूमिका साकारणार आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha