Jhund : सध्या सोशल मीडियावर झुंड (Jhund) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  नागराज मंजुळेनं (Nagraj Manjule) या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी या चित्रपटासाठी अमिताभ यांनी घेतलेल्या मानधनाबाबत सांगितलं.


संदीप सिंहनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'बच्चन सरांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. कमी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मीती कशी करायची असा आम्ही विचार करत होतो. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मानधन कमी केले. ते म्हणाले होते की, माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर पैसे खर्च करूयात.तसेच अमिताभ बच्चन यांच्या स्टाफनं देखील त्यांचे मानधन कमी केले.'
 
संदीप सिंह यांनी पुढे सांगितलं, '2018 मध्ये नागराजनं पुण्यात या चित्रपटाचा सेट उभारला. पण पैसे कमी असल्यानं हा सेट हटवण्यात आला. टी सीरिजच्या सहाय्यानं आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली, आम्ही पूर्ण चित्रपटाचे शूटिंग हे नागपूर येथे केले. मी यासाठी भूषण कुमार यांचे आभार मानतो.  '






झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha