एक्स्प्लोर

Priya Marathe Passes Away: माझी बहीण लढवय्या होती, पण तिची ताकद कमी पडली, प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेची पोस्ट

Marathi Actress Priya Marathe Passes Away: छोट्या पडद्यावरील मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे शनिवारी निधन झाले. ती अवघ्या 38 वर्षांची होती.

Priya Marathe & Subodh Bhave: मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ती 38 वर्षांची होती. गेल्या काही वर्षांपासून प्रिया मराठे (Priya Marathe Death) हिला कर्करोगाची लागण झाली होती. तिने यावर मातही केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोग पुन्हा तिच्या शरीरात पसरु लागला होता. तिच्यावर उपचारही सुरु होते. मात्र, शनिवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे (Priya Marathe) हिच्या अकाली जाण्याने मराठी रसिकांना मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यामुळे तिचा चेहरा घराघरात पोहोचला होता. त्यामुळे तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रिया मराठे हिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, " प्रिया मराठे " एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार.  पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण.  या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. " तू भेटशी नव्याने " या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघेहा भक्कमपणे  तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती,  पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. ओम शांती, असे सुबोध भावे याने आपल्या पोस्टमध्ये मह्टले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज पहाटे प्रिया मराठे हिने मिरारोड येथील तिच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. तिच्यावर दुपारी तीन वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. 

आणखी वाचा

Priya Marathe Passes Away : मोठी बातमी: अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, 38 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget