एक्स्प्लोर

Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...

Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचे जाहीरपणे आभार मानलेले, पण त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलेलं. आता त्यांनी ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलंय.

Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: मराठी सिनेसृष्टीला (Marathi Film Industry) सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) आलेल्या 'देऊळ बंद 2'नं (Deool Band 2) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवलं आणि 100 कोटींचा गल्ला जमवलाय. अजूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. 'देऊळ बंद 2' निमित्त दिलेल्या सर्वच मुलाखतींमध्ये प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी सिनेमासाठी मदत करणाऱ्यांचे आभार मानलेत. यामध्ये बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानचाही (Shah Rukh Khan) समावेश होता. 

प्रवीण तरडे (Marathi Actor Pravin Tarde) यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'देऊळ बंद 2' सिनेमाचं बजेट मर्यादित असल्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनच्या काही कामांसाठी शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटनं आर्थिक सवलत दिलेली. या मदतीबद्दल त्यांनी जाहीरपणे शाहरुख खान आणि त्याच्या कंपनीचे आभार मानलेले. मात्र, यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्यांच्यावर धर्माच्या आधारावर टीका करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी ट्रोलर्सना चांगलंच झोडून काढलंय. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने मदत केली असेल, तर त्याचे आभार मानण्यात धर्म, जात किंवा पंथ आड येत नाही. चांगुलपणाला धर्म नसतो, असं प्रवीण तरडे म्हणाले आहेत. 

प्रवीण तरडे शाहरुख खानमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarde On Shah Rukh Khan)

प्रवीण तरडे यांनी नुकतंच 'पॉडकट्टा'ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना 'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "इथे हिंदू-मुस्लीम म्हणण्याचा प्रश्न काय आहे? तो सिनेमावाला, मी सिनेमावाला. मी त्याच्याकडे (रेड चिलीज स्टुडिओमध्ये) डिस्काउंट मागितला आणि त्यानंतर त्यानं शाहरुखनं त्याच्या टीमला इतकंच विचारलं की, चित्रपट चांगला आहे की नाही? सगळेजण म्हणाले, अप्रतिम सिनेमा आहे. म्हणून त्याने पैसे कमी केले. DCP (Digital Cinema Package थोडक्यात सिनेमाची कॉपी) काढायचा होता. पैसे पूर्ण भरल्याशिवाय DCP अजिबात देत नाही. पण, शाहरुख तेव्हा म्हणाला, DCP द्या…बिलाचं नंतर बघूया."

प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, "त्यानं नुसता डिस्काऊंटच दिला नाही, तर थेट आम्हाला डीसीपी (डिजिटल सिनेमा पॅकेज - चित्रपटाची फायनल कॉपी) देऊन टाकली. सिनेमा रिलीज करायचा होता आणि आमचे पैसे भरायचे राहिले होते. तो म्हणाला, 'पहिली डीसीपी द्या, बिलाचं नंतर बघू' हा त्याचा मोठेपणा नाही का रे? जर एखाद्यानं एवढ्या मोठ्या मनानं आपल्याला मदत केली, तर जात-पात आणि धर्म बघून आपण त्याचे उपकार विसरायचे का? ते मानलेच पाहिजेत..."

"जिथे हिंदुत्ववादाचा प्रश्न आहे, तिथे मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये. ज्यावेळी मी 'मुळशी पॅटर्न' सिनेमा केला, त्यात दिसला शेतकरीच ना! ज्यावेळी शाहरुख खानचे आभार मानायचे होते, तेव्हा मानले ना! माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार याचा संबंधच नाहीये. जो चांगला आहे तो चांगला आहे. त्यातही आम्ही एका सिनेमामुळे जोडलो गेलो होतो. आता सलमान खान सुद्धा त्याच्या घरी गणपती आणतोच ना…बरं तो सोशल मीडियावर हे सगळं शेअर सुद्धा करतो...", असं प्रवीण तरडे म्हणाले. 

"जिथे विचार मांडायचे असतात…तिथे माणसाने कणखर राहिलंच पाहिजे. आता आम्ही गरजू मुलांना मदत करतो…तेव्हा आपण त्यांना विचारसरणीबद्दल विचारत नाही. गरजवंताला विचारसरणी आणि धर्म नसतो' असं प्रवीण यांनी शेवटी सांगितलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: "मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय..."; पहाटे 3 वाजता 'बिग बीं'नी फिरवला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget