एक्स्प्लोर

Pravin Tarde On Deool Band Trolling Posts: 'एका बॉलीवूड स्टारचं नाव काय घेतलं तुमच्या..' प्रवीण तरडेंचा इंडस्ट्रीतील लेखक दिग्दर्शकांवर संताप; video करत थेट सुनावलं,म्हणाले..

या सगळ्यावर आता प्रवीण तरडेंनी  ट्रोलर्सला आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील काही लेखक दिग्दर्शकांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे.

Pravin Tarde on Deool Band Trolling Shahrukh Khan: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2:आता परीक्षा देवाची ' (Deool Band 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यानिमित्ताने गावागावात फिरताना दिसतात. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 80 कोटींचा टप्पा ओलांडलाय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'देऊळ बंद 2 'चित्रपटासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी बॉलीवूड किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan)चित्रपटाला कशी मदत केली, असं सांगितल्यानंतर अनेकांनी त्याबाबतीत पोस्ट लिहिल्या. अनेकांनी सोशल मीडियावर चित्रपटाला आणि प्रवीण तरडे यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, या सगळ्यावर आता प्रवीण तरडेंनी  ट्रोलर्सला आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील काही लेखक दिग्दर्शकांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ करत सगळ्यांचीच खरडपट्टी त्यांनी काढली.

नेमकं काय म्हणाले प्रवीण तरडे?

दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले ' 'रामराम. मी प्रवीण विठ्ठल तरडे. गेल्या 29 दिवसांपासून ' देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची' चित्रपटासाठी अख्खा महाराष्ट्रभर मी फिरतोय. उन्हातान्हात,पावसात, मध्यरात्री, पहाटे, दिवसा.. तुम्ही माझ्या सगळ्यां वेळांना व्हिडिओ पाहिलेत. विदर्भ, खानदेश,  पश्चिम महाराष्ट्र, पुणे ,मुंबई, ठाणे, सगळं झालं. दिवस रात्र फिरलो ना.. अमरावती, एरंडोल, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव, जळगाव, नाशिक ,शिर्डी.. सगळं फिरलो की.. उन्हातानात 48 डिग्रीत.. तेंव्हा तुम्ही कोणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या हो. कुणी तेव्हा कोणी लिहिलं नाही.  माझ्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांनीही...एका बॉलीवुड स्टारचं मी नाव काय घेतलं, धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या. पब्लिसिटीसाठी मराठी माणसाने नक्की करायचं काय?खेड्यापाड्यातून, उन्हात फिरायचं की, मस्त एसीत बसून एखाद्या बॉलीवूड स्टारचं नाव घ्यायचं. तुम्ही मोकळे.. ' असं ते म्हणाले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा ...

ते पुढे म्हणाले, 'मी वाचले आहेत तुमच्या पोस्ट. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा. 'देऊळ बंद 2 ' शंभर कोटींना जाणार. चाललाय. तुमच्या ठिकाणी आणि पोस्टने त्याला फरक पडत नाही. चला मंडळी भेटू. 'देऊळ बंद ' चालला आहे. त्याच्या गतीने चाललाय. फक्त जाता जाता विंदा करंदीकरांची कविता सांगतो.

'उंची न वाढते आपली, फारसी वाटो न हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा.'

मग तो पिट्या असू दे,नाहीतर शाहरुख खान असू दे. ज्याने आपल्याला मदत केली, जाहीरपणे त्याचे कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे.धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र .हाच आपला मराठी बाणा आहे. '

हेही वाचा:

Deool Band 2: 'देऊळ बंद 2' चं बजेट 12 लाखांवरून 42 लाखांवर गेलं अन् पैसेच संपले; बॉलिवूडचा किंग खान आला मदतीला धावून; प्रविण तरडे म्हणाले ..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget