Prarthana Behere : 'बेबी गर्ल'; प्रार्थना बेहरेच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री
नुकताच प्रार्थनानं (Prarthana Behere) एक खास पोस्ट शेअर केला आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

Prarthana Behere : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो प्रार्थना शेअर करतो. प्रार्थना ही 'पेट लव्हर' आहे. प्रार्थनाकडे गब्बर आणि फिल्मी नावाची दोन कुत्री आहेत. गब्बर आणि फिल्मीसोबतचे फोटो प्रार्थना सोशल मीडियावर शेअर करते. आता प्रार्थनाच्या घरी नव्या पाहूण्याची एन्ट्री झाली आहे. या पाहुण्याचं नाव मूव्ही असं आहे. मूव्हीसोबतचा एक खास व्हिडीओ प्रार्थनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रार्थनाची पोस्ट
प्रार्थनानं मूव्हीसोबतचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रार्थनानं कॅप्शन दिलं, 'माझ्या नव्या बेबी गर्ल 'मूव्ही' ला भेटा.' प्रार्थनानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'मूव्ही' ही प्रार्थाच्या जवळ बसलेली दिसत आहे. या व्हिडीओला प्रार्थनाच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', व्हॉट्स अॅप लग्न, ती आणि ती या चित्रपटांमध्ये प्रार्थनानं प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत प्रार्थनासोबतच अभिनेता श्रेयस तळपदेनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे प्रार्थना बेहरेनाला विशेष लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा :
- Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून विश्वजित काका घेणार ब्रेक; 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार
- PHOTO : कुण्या राजाची तू गं राणी... प्रार्थना बेहेरेचा रॉयल अंदाज पाहून चाहते झाले स्तब्ध!























