एक्स्प्लोर

Pranit More Income: “370 रुपयांची बिर्याणी” पडली महागात, प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? एका शोमधून किती कमावतो?

Pranit More 370 biryani controversy: वादानंतर प्रणित मोरेच्या संपत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Pranit More Income per Show: सोशल मीडियाच्या जगात रातोरात प्रसिद्धी मिळवणे जितकं सोपे आहे, तितकेच वादात अडकण्याची शक्यता जास्त असते. स्टँड अप कॉमेडियन समय रैनानंतर प्रणित मोरेवर (Pranit More) नेटकऱ्यांनी टीकेची तोफ डागली. प्रणित मोरे सध्या त्याच्या एका शोमधील व्हायरल व्हिडीओमुळे वादात अडकला आहे. शोमधील ऑडियन्सने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. गुरुग्राममधील एका तरुणासोबतच्या त्यांच्या संभाषणाची व्हिडीओ क्लिप समोर येताच लोकांनी संताप व्यक्त केला. 370 रुपयांची बिर्याणी प्रकरणानंतर हिमांशू जांग्राची नोकरी गेली.   तर, प्रणित मोरे याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गदारोळात प्रणित मोरे, एका शोमागे किती कमावतो? आतापर्यंतची त्याची कारकिर्द कशी राहिली? प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? जाणून घेऊयात.

370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद नेमका कसा सुरू झाला? (Pranit More Income)

हा संपूर्ण वाद प्रणित मोरेनं होस्ट केलेल्या एका लाईव्ह स्टँड अप शो दरम्यान झाला होता.  गुरुग्राममधील शोमध्ये हिमांशू जांग्रा या तरुणानं खुलासा केला की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. त्यानं त्या तरुणीला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली. '370 रुपयांची बिर्याणी तिला खाऊ घातली आता ते वसूल करावे लागतील ना....' असं त्या तरुणानं म्हटलं होतं. बिर्याणीच्या बदल्यात तरुणीकडून शारीरिक जवळीकची अपेक्षा असल्याचे त्याच्या वक्तव्यातून सूचित होत होते.   

या अश्लील वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याऐवजी शोचा होस्ट प्रणित मोरे यावर विनोद करत हसला. अशा घृणास्पद मानसिकतेला  प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा या दोघांवरही टीका करण्यात आली.  वाद इतका चिघळला की,  पोलिसांनी प्रणित मोरे याच्याविरोधात  कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला.  तर, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिमांशू या तरुणालाही आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागली. कंपनीनं त्याला नोकरीवरुन काढले.

एका शोमधून प्रणित मोरे किती कमावतो? (How Much Pranit more Earn from per show)

या मोठ्या वाद प्रकणानंतर प्रणित मोरेच्या जीवनशैली आणि कमाईबद्दल बरीच चर्चा रंगलीये. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार,  प्रणित मोरेच्या लाइव्ह शोसाठी कोणतेही निश्चित मानधन किंवा तिकीट विक्रीतून निश्चित उत्पन्न मिळत नसते.  मात्र, असा अंदाज आहे की, तो आपल्या स्टँड अप शो किंवा लाइव्ह इव्हेंटमधून साधारण 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमावतो. तिकीटांची मागणी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणानुसार, त्याच्या उत्पन्नात चढ- उतार होत असते, अशी माहिती आहे. 

लाइव्ह शो व्यतिरिक्त, प्रणित मोरेच्या उत्पन्नाचे इतर प्रमुख स्त्रोत

प्रणित मोरेकडे इतर अनेक उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. कॉमेडियन मोरेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत डिजिटल तिकीट विक्री,  प्रमुख ब्रँड्ससाठीच्या जाहिराती आणि यूट्यूब व्हिडीओंमधून येतो.  त्याच्या व्हिडीओंना लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात.  याव्यतिरिक्त तो इतर ब्रँड्ससोबत पेड प्रोमोशन करतो, यातूनही त्याची कमाई होते. इंटरनेट आणि लाईव्ह एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह असल्याकारणाने प्रणित मोरेनं चांगलीच संपत्ती कमावली आहे. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रणित मोरेची एकूण संपत्ती 4 कोटी ते 8 कोटी रुपयांच्या दरम्यान, असल्याची माहिती आहे.  

प्रणित मोरेच्या कारकि‍र्दीची सुरुवात अगदी सामान्य होती.  त्यानं सुरुवातील ऑटोमोबाईल शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. त्यानंतर रेडिओ मिर्चीवर आरजे म्हणून काम केले. सुरुवातीच्या काळात त्याला 11 हजार रुपये पगार होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मी चुकलो, थांबवू शकलो असतो...प्रणित मोरेने हात जोडले; शोमध्ये नेमकं काय घडलं?, माफी मागत सगळं सांगितलं!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget