Prajkta Mali Social Media Post : अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) हिने नुकतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर आता पुन्हा एका तिच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 


प्राजक्ता ही फुलवंती हा सिनेमाची निर्मिती करत आहे. या सिनेमाचं नुकतच शुटींग पूर्ण झालं. त्याचनिमित्ताने प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. पण यावर प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शनची विशेष चर्चा रंगली आहे. तसेच हा फुलवंती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 


प्राजक्ताची पोस्ट नेमकी काय?


प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर फुलवंती सिनेमाच्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने म्हटलं की, ज्या क्षणाची मी गेलं पुर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते; तो क्षण.‘निर्माता’ आणि ‘एक्झिक्युटर’ म्हणून ‘फुलवंती’ चित्रपटाच्या शुटींगचं दुसरं आणि अंतिम वेळापत्रक काल पूर्ण केलं. “शिवोहम क्रिएशन्सचा पहिला प्रकल्प.“फुलवंती” हा माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. मागील दोन वर्षांपासून मी या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष दिला आहे. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात या प्रोजेक्टने अनेक धडे देखील शिकवले. जे माझ्या पाठीशी उभे राहिले, पाठिंबा दिला आणि मदत केली त्यांचा आभारी आहे.


पुढे त्यांनी म्हटलं की,  ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केले आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. शेवटी माझी सगळी कामं झालीच. यामध्ये आम्ही बरेच शिकोल आणि त्यातून वाचलो देखील. त्याचप्रमाणे मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, आपण जे साध्य करु शकलो ते मानवी दृष्ट्या शक्य नाही. पण एका शक्तिशाली उर्जेने आम्हाला हे प्रोजेक्ट सुरु ठेवण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद दिली.  






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा पहिला स्पर्धक ठरला? 'कोकण हार्टेड गर्ल'च्या नावाची जोरदार चर्चा