एक्स्प्लोर

Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?

अपघातानंतर गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. 

Popular  Singers Accident: ‘मोगरा फुलला’ कार्यक्रम आटपून परतत असताना प्रसिद्ध गायक गणेश शिंदे (Ganesh Shinde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र,या अपघातात गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली आहे. तर गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दोघींवरही तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

मोगरा फुलला’ आणि ‘ज्ञानियांचा राजा’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे गणेश शिंदे आणि त्यांची टीम रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. संत साहित्यावर आधारित गाणी आणि व्याख्यानांमुळे या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे. 

नेमके घडले काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय कार्यक्रम पूर्ण करून गणेश शिंदे, सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा हे तिघे घरी परतत होते. यावेळी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात होताच गाडीतील एअरबॅग्स क्षणार्धात उघडल्या आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.या अपघातात गणेश शिंदे यांच्यासह गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा जखमी झाल्या असून दोन्ही गायिकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.दरम्यान, अपघातानंतर गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. 

गणेश शिंदे यांची पोस्ट

"कानावरून गेल.. 'मोगरा फुलला' कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्स मुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीने मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले. प्रतिक्षाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटले तू आत्ता बरी होशील आणि माऊली समोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी...

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Shinde (@ganeshshindeofficial)

या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवत... अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचे...आपल्या सर्व रसिकश्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा व आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केले व तातडीने मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो. तुकोबारायांच्या शब्दांत एवढंच -
"कृपाळू सज्जन,तुम्ही संतजन ..परी पायावेगळा करू नका..."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget