एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सायना'च्या सेटवर अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी
सायना या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी झाली. तिच्या मानेला दुखापत झाली आहे.
मुंबई : फुलराणी सायना नेहवालच्या हिच्या बायोपिकसाठी बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा जीवतोड मेहनत घेताना दिसत आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी कसून सराव देखील करत आहे. याचदरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे.
परिणीती चोप्राने ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली, "मला कुठं दुखापत होऊ नये, यासाठी मी आणि सायना चित्रपटाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेतात. पण, तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी जास्तीत जास्त आराम करणार आहे." असं परिणीतीनं म्हटलं आहे.
बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या बायोपिकमध्ये परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे. 11 ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. सायनानं याचा फोटो शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तर, या चित्रपटासाठी माझी निवड करण्यात आली ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. या चित्रपटासाठी माझ्यावर खूप मेहनत घेण्यात येत आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकांकडून मला प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरची माघार बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची व्यक्तीरेखा साकारणार होती. मात्र, 'साहो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यानं सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येणार नसल्याचं कारण देत अचानक श्रद्धानं या चित्रपटातून काढता पाय घेतला. श्रद्धाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा खूप मेहनतही घेत होती. तसंच तिचं लूक टेस्टींगही झालं होतं. श्रद्धानं हा चित्रपट सोडल्यावर आता तिची जागा परिणीती चोप्रा हिने घेतली आहे. संबंधित बातम्या - फुलराणी बदलली, श्रद्धाऐवजी परिणिती साकारणार सायना नेहवालची भूमिका परिणीतीने मागितले 37 कोटी, निक म्हणतो दुप्पट घेDude. Me and the entire team of Saina have been taking so much care that I shouldn't get an injury, but shit happens! Will rest it as much as I can before I can start playing badminton again. ???? #SainaNehwalBiopic pic.twitter.com/mDOZ1iSNfS
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) November 15, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement