Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Palash Muchhal Sangli Police: गायक आणि दिग्दर्शक पलाश मुछल याची सांगली पोलिसांकडून चौकशी

Palash Muchhal Sangli case: गायक आणि दिग्दर्शक पलाश मुछल (Palash Muchhal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चर्चेत येण्यामागचं कारण पर्सनल नसून, फसवणुकीचा आरोप करण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. पलाश मुछल याची सांगली पोलिसांकडून (Sangli Police) चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सांगलीमध्ये पलाश मुछलविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता उच्च न्यायलयाकडून जामीन मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे (Crime) जमा करण्यासाठी पलाश मुछल सांगली शहर उपविभागीय कार्यालयात हजर झाला होता.
पलाश मुछलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय? (Palash Muchhal Sangli Police case)
मिळालेल्या माहितीनुसार, गायकाविरोधात दाखल असलेल्या फसवणूक आणि अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशी दरम्यान, प्रकरणाच्या संबंधित विविध मुद्द्यांवर पोलिसांनी पलाश मुछलकडून माहिती घेतली असल्याचे समजते. दरम्यान, चौकशीदरम्यान, पलाश मुछलने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
View this post on Instagram
माहितीनुसार, उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर न्यायलयीन प्रक्रियेचा भाग म्हणून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी गायक सांगलीत गेला होता. सांगली शहर उपविभागीय कार्यालयात त्याने संबंधित कागदपत्रे जमा केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर पलाश मुछल तातडीने मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. दरम्यान, आता या प्रकरणात गायकावर करण्यात आलेले आरोप, न्यायलयीन प्रक्रिया आणि पोलिसांकडून सुरु असलेली चौकशी यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha























