Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Ashok Saraf Fathers Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचे निधन झाले होते. पण त्यांनी शूट अर्ध्यात सोडले नाही.

Ashok Saraf Fathers Death in between shoot: मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ मराठीच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी कायम आपल्या कामाला प्राधान्य दिलंय. बऱ्याचदा अभिनयाच्या मुखवट्यामागेही दु:ख लपलेलं असतं. कोणता कलाकार कोणत्या दु:खातून जात आहे, हे आपल्याला त्यांच्या अभिनयातून ओळखणं कठीण होतं. आपल्या वडिलांच्या निधनानंतरही (Ashok Saraf Fathers Death) अशोक सराफ यांनी आपल्या भावना दाबून, Show Must Go Onचा विडा उचलला होता. असाच एक किस्सा मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये यांनी सांगितला. शूटिंग सुरु असतानाच अशोक सराफ यांना वडील गेले असल्याची माहिती मिळाली होती. मग त्यांनी शूटिंग पूर्ण कसं केलं? याची माहिती समीर आठल्ये यांनी मुलाखतीतून दिली.
शूटिंग सुरु असतानाच अशोक सराफ यांचे वडील वारले, नेमकं काय घडलं? (Ashok Saraf Fathers Death in between shoot)
समीर आठल्ये. हे प्रसिद्ध कॅमेरामन असून, प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे पती आहेत. अलिकडेच त्यांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विविध कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. कॅमेऱ्यामागच्या कलाकारांचे किस्से शेअर केले. या मुलाखतीत त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्या आयुष्यातील दु:खद घटनेबद्दल सांगितलं. समीर आठल्ये म्हणाले की, 'आम्ही 'तू सुखकर्ता' नावाचा सिनेमा करत होतो. त्यावेळेला मोबाईल नव्हते. एका बंगला होता. त्या बंगल्यावरील टेलिफोनवर कॉल यायचे. एक कॉल आला होता, समोरचा व्यक्ती म्हणाला की, अशोक सराफांसोबत बोलणं होऊ शकतं का?', तेव्हा सारखे फोन येत होते. शेवटी फोन घेण्यासाठी आमचे प्रॉडक्शन मॅनेजर गेले. तेव्हा ते शांत झाले'..
'अशोक सराफ शूटिंगमध्ये होते. त्या बंगल्यातील शूटचा शेवटचा दिवस होता. अशोक सराफ यांना सांगण्याचा प्रयत्न सुरु होता. पण अशोक सराफ सीन शूट करत होते. फोन पुन्हा वाजल्यानंतर एन. एस वैद्य कॉल उचलायला गेले. सेटवर आल्यानंतर त्यांना हुंदका आला. आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. अभिनेत्री निशिगंधा होती. कुणालाच कळेना नक्की झालंय काय? मला वैद्य म्हणाले की, जे काही सीन्स उरले आहेत, ते लवकर शूट पूर्ण करुन टाक. वातावरण गंभीर झालं होतं. अशोक सराफ यांना सांगण्यात आलं की, तुझे सीन्स झाले आहेत, शेड्यूलमध्ये पॅकअप झालं आहे, असं वैद्य म्हणाले. यानंतर वैद्य यांना रडू अनावर झालं. अशोक सराफ यांनी त्यांना विचारलं की, काही प्रोब्लेम नाही ना? रिटेक नाही ना? सगळं ओके ना? मी जाऊ का? असं म्हणाले, अशोक सराफ टर्न झाले, त्यांचा हुंदका निघाला. ते पळत गेले. तो फोन अशोक सराफ यांचे वडील गेले, हे सांगण्यासाठी वारंवार येत होता'.
'अशोक सराफ निघताना म्हणाले की, मला माहित होतं की, ते सिरिअस आहेत. प्रॉड्यूसरचं काही अडायला नको आणि काम थांबायला नको, म्हणून त्यांनी काम पूर्ण केलं. पहिला फोन आला त्यांना याची कल्पना आली होती. पण हे त्यांचं Dedication होतं. सीन पूर्ण केल्यानंतरही सर्वांना त्यांनी विचारलं की, काही काम बाकी नाही ना? आणि मग पॅकअप म्हटल्यावर अशोक सराफ निघून गेले', असं समीर आठल्ये यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















