एक्स्प्लोर

ऑस्कर पुरस्काराच्या तारखा जाहीर, पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये पार पडणार सोहळा

दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगातल्या सिनेविश्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे या स्पर्धेत येतात आणि त्यातून ज्युरी उत्तम सिनेमे निवडतात.

मुंबई : अकॅडमी अॅवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कारांची लगबग आता सुरू झाली आहे. कोरोनाचा फटका जसा अमेरिकेला बसला तसा तो त्यातल्या हॉलिवूडलाही बसला. चित्रपटांची चित्रिकरणं थांबली. रिलीजच्या तारखा पुढे गेल्या. याचा थेट पहिणाम ऑस्कर सोहळ्यावर झाला. म्हणूनच ऑस्करचं कामही थांबलं. आता या सोहळ्याची नवी तारीख जाहीर झाली आहे. ऑस्कर अकादमीच्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली गेली आहे. छोटेखानी वेळापत्रकच यात शेअर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार ऑस्करच्या शर्यतीत उतरायचं असेल तर 1 जानेवारी 2021 सिनेमांची एन्ट्री पाठवावी लागणार आहे. त्यानंतर सर्व सिनेमांच्या कागदपत्रांची छाननी करून या स्पर्धेला पात्र असलेल्या सिनेमांची अंतिम यादी 9 फेब्रुवारीला येईल. ऑस्करची नामांकनं जाहीर होणार आहेत 15 मार्च 2021 ला. आणि अंतिम सोहळा 25 एप्रिल 2021 पार पडणार आहे. दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगातल्या सिनेविश्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे या स्पर्धेत येतात आणि त्यातून ज्युरी उत्तम सिनेमे निवडतात. वेगवेगळ्या विभागांत उत्तम सिनेमांची निर्मिती होते. यंदाचं या स्पर्धेचं 93 वं वर्षं आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा होत असतो. पण यंदा कोरोनामुळे यात जवळपास तीन महिन्यांची गॅप पडली. या काळात अमेरिकेसह संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार उडवल्यामुळे मार्च ते जून या काळात सर्वच जगभरात सिनेमाचं प्रदर्शन, चित्रीकरण थांबलं होतं. त्यामुळे सिनेमे रिलीजच झाले नाहीत. त्यामुळे ऑस्करची तयारीही लांबली. आता हे पुरस्कार 25 एप्रिलला होणार आहे. म्हणूनच येत्या काळात जगभरात उत्तमोत्तम सिनेमे प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. भारतातर्फे यंदा ऑस्करसाठी कोण जाईल याचीही चाचपणी केली जातेय. त्याबद्दलही समिती सर्व सिनेमे पाहून भारतातर्फे अधिकृत प्रवेश भरला जातो. यंदा डिसायपल या चित्रपटाकडून तशी अपेक्षा बाळगली जातेय. डिसायपल हा चैतन्य ताम्हाणेचा चित्रपट असून त्याने यापूर्वी कोर्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Dharau Poster: लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Kiara And Siddharth Second Child: 'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
Amitabh Bachchan on Hairs And Height: 'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं
'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Embed widget