एक्स्प्लोर

अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन, मुख्यमंत्र्यांसमोर हातात हात

आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीवर पोहचले होते. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका करणारे चंद्रकांत खैरे देखील आपली बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. या संपूर्ण प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्याच्या दिवशी त्यांना समजावण्यासाठी गेलेले आंबादास दानवे देखील मातोश्रीवर पोहोचले होते.

मुंबई : मागील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राने अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात रंगलेला वाद पाहिला. हा वाद थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला. अखेर आज या दोघांचं मनोमिलन करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. दोघांमधील वाद मिटल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. कालचं अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीत औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं तसेच त्यांच्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्याना दिली, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीवर पोहोचले होते. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका करणारे चंद्रकांत खैरे देखील आपली बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. या संपूर्ण प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्याच्या दिवशी त्यांना समजावण्यासाठी गेलेले अंबादास दानवे देखील मातोश्रीवर पोहोचले होते. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरेंमधील समज-गैरसमज दूर झाले आहेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे. तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य होणार नाही असा शब्द दोघांनीही मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितलं. दोघांनीही एकत्र पक्षासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. हे दोघेही पक्षवाढीसाठी काम करतील, आपली ताकद मोठी आहे आणि आता ही ताकत अजून वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. हेही वाचा - अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे आमच्यातील वाद मिटलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर चर्चा झाली. आता आम्ही पक्षशिस्तीनुसार काम करु. आगामी निवडणुकांसाठी हातात हात घेऊन काम करु, असे  चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि माझ्या गैरसमजातून काही गोष्टी झाल्या. मात्र आता पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच काम होईल. पक्षाच्या आदेशाचं पालन होईल. आता पुढे कधीही असा वाद होणार नाही, असे मंत्री सत्तार म्हणाले. काय होता नेमका वाद? औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके (काँग्रेस) विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल. जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. उपाध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांकी काजे (शिवसेना) यांना 28 मतं मिळाली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेलं, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका | Aurangabad | ABP Majha  चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली होती. खैरे म्हणाले की, आजच्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला अब्दुल सत्तारांचं मतदान मिळालं नाही. त्यामुळे सत्तारांना आता मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. खैरे म्हणाले होते की, अशा गद्दारांना (सत्तार) पक्षात राहण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत असा एकेरी उल्लेख करत खैरे यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला. खैरे म्हणाले की, सत्तार महायुतीचे मंत्री आहेत, तरीदेखील ते सहा सदस्यांना घेऊन भाजपकडे गेले. त्यांनी भाजपकडे जावं. मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची ताकद असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढावी आणि निवडून यावं. खैरे म्हणाले की, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण आजच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला सत्तारच जबाबदार आहेत. या गद्दाराला पवित्र 'मातोश्री'च्या (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) आत प्रवेश देऊ नका, अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Embed widget