S.S. Rajamouli : एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' (RRR) चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. RRR ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्याचवेळी, नुकतेच या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यालाही 80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स (80th Golden Globe Awards 2023) मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाने यशाची आणखी एक कहाणी लिहिली आहे. 


राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व यशादरम्यान 'टायटॅनिक' आणि 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी आरआरआरबद्दल असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे RRR चे दिग्दर्शक राजामौलींचा आनंद गगनात मावत नाहीये.  


काय आहे संपूर्ण प्रकरण?






खरंतर, पुरस्कार सोहळ्यानंतर राजामौली यांना जेम्स कॅमेरून यांना भेटण्याची संधीही मिळाली. या भेटीचा राजामौली यांनी जेम्स कॅमेरूनसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, आम्हा दोघांमध्ये सुमारे 10 मिनिटं संभाषण झाले. 'महान दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी आरआरआर पाहिला... त्यांना तो इतका आवडला की त्यांनी पत्नी सुझीला तो पाहण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर पुन्हा चित्रपट पत्नीबरोबर पाहणार असं त्यांनी सांगितलं." पुढे ते म्हणले सर, तुम्ही आमच्याशी संपूर्ण 10 मिनिटं चित्रपटाबद्दल बोललात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही."




बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला याची माहिती मिळताच तिलाही खूप आनंद झाला. आलियाने सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीही शेअर केली आहे. आलिया भट्टने जेम्स कॅमेरॉनच्या स्तुतीचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उफ्फ, किती छान सकाळ होती.'


विशेष म्हणजे जेम्स कॅमेरूनच्या चित्रपटांचे चाहते जगभरात आहेत. खुद्द एसएस राजामौलीही त्यांची स्तुती करताना थकत नाहीत. अशा परिस्थितीत जेम्स कॅमेरूनकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर आरआरआर चित्रपटाची संपूर्ण टीम खूश आहे.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Critics Choice Awards 2023 : राजामौलींचा 'RRR' ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा! पटकावला 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड'