Nashik Padvidhar Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar election) क्षणाक्षणाला नवा ट्विस्ट अनुभवयास मिळत असून परवा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. तर आज माघारीच्या दिवशी पाटील मात्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. एकीकडे माघारीसाठी अवघा एक तास शिल्लक असताना नाशिक पदवीधर मतदारसंघात चांगलाच पेच उभा राहिला आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार तसेच धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत समीकरण बदलले. मात्र या समीकरणानंतर शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने गोंधळ उडाला आहे. आज माघारीचा शेवटचा दिवस असून अवघा एक तास शिल्लक असताना अशा प्रकारे शुभांगी पाटील यांनी नॉट रिचेबल आल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीत शेवटपर्यंत नेमकं काय घडणार आहे? हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीची दिवसागणिक वाढत जात आहे. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म मिळूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि.
मीच मविआचा उमेदवार, अॅड सुभाष जंगले यांचा दावा
दरम्यान, एकीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल असताना दुसरीकडे अॅड सुभाष जंगले यांनी आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. "शुभांगी पाटील ज्यावेळी मातोश्रीवर होत्या तेव्हा आपणही मातोश्रीवर होतो. उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठलाही शब्द शुभांगी पाटील यांना दिलेला नाही. इतर दोन्ही पक्षाशी चर्चा केल्यानंतर उमेदवार जाहीर करणार असल्याचं ठरलं," असा दावा अॅड. सुभाष जंगले यांनी केला आहे. तसंच शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी मला तीन वाजेपर्यंत थांबण्याचा सल्ला दिल्याचंही ते म्हणाले.
गिरीश महाजन नाशिकमध्ये
दरम्यान भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे कालपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. कुठल्याही पद्धतीने भाजपकडून इच्छुक उमेदवार होते. त्यांना माघार घ्यायला लावावी याच निश्चयाने ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. तर धनराज विसपुते हे फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या नसला शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांच्यासह कुटुंबीयांचा फोन बंद येतो आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. धनराज विसपुते यांच्याकडून अद्याप काही निर्णय झाला नसला तरी शुभांगी पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी आता जोरदार प्रयत्न हे केले जात आहेत. मात्र शुभांगी पाटील संपर्क साधत नाही. त्यामुळे नेमक्या पडद्यामागे काय घडामोडी घडतात , हे सांगणे अवघड झाले आहे.