एक्स्प्लोर

Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या चित्रपटाच्या सक्सेसची एकच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केलेले आहे या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या या चित्रपटाच्या यशानिमित्त मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकार,राजकीय नेते आणि चित्रपटाची टीम यांच्या उपस्थितीत एक धमाकेदार सक्सेस पार्टी झाली. या कार्यक्रमाचे सध्या एकच चर्चा आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या चर्चा आहे. 

खरंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची मैत्री कायम चर्चेत असते. लहानपणीचा जिवलग मित्र आज मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट लेखक दिग्दर्शक ठरलाय. असं म्हणत त्यांनी प्रवीण तरडे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

काय म्हटलं मुरलीधर मोहोळ यांनी? 

दिग्दर्शक लेखक व भिनते प्रवीण तरडे यांच्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ते म्हणाले 'गोष्ट मोठी, १०० कोटी; अभिमान… मित्राच्या यशाचा ! बालपणापासूनचा माझा जिवलग मित्र, आणि आज मराठी चित्रपटसृष्टीतील सलग सहा सुपरहिट चित्रपट देणारा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे याच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या दैदीप्यमान यशानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होतान मन अतिशय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

बालपणापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांचा प्रवास जवळून पाहिला आहे. संघर्ष, कष्ट, स्वप्नं आणि त्यासाठी घेतलेली अथक मेहनत… या प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कोणतीही सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसताना, एका सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रविणने आपल्या जिद्द, प्रतिभा आणि अविरत परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर असंख्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.एक मित्र म्हणून त्याच्या या यशाचा मनापासून अभिमान वाटतो. ‘देऊळ बंद २’च्या या ऐतिहासिक यशासाठी प्रविण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! मराठी चित्रपटसृष्टीला अशीच नवनवी शिखरे गाठत राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Murlidhar Mohol (@murlidharkmohol)


कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहनजी जोशी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक श्री. राजेशजी पांडे, चित्रपटाचे निर्माते कैलाश वाणी, सिटी प्राइड थिएटर्सचे चाफळकर बंधू, श्री. अभिजित पानसे, श्री. मंगेश देसाई, स्नेहल प्रवीण तरडे, श्री. प्रसाद ओक, श्री. महेश लिमये, श्री. संजय जाधव, श्री. अवधूत गुप्ते, श्री. आदीनाथ कोठारे, श्री. कुशल बद्रिके, श्री. संतोष जुवेकर, श्री. सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्री. अभिजित खांडकेकर, श्री. विजू माने, डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक उपस्थित होते." अशी पोस्ट मंत्री मुरलीधर मोहळ यांनी केलीय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget