Munawar Faruqui :  कॉमेडियन आणि अभिनेता मुन्नवर फारुकीने (Munawar Faruqui)  नुकताच बिग बॉसचा (Bigg Boss) खिताब जिंकला. त्यानंतर तो सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसचा खिताब जिंकल्यानंतर डोंगरीत त्याच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी जमली होती. शिवाय ड्रोनने शूटींग केल्याने मुन्नवरच्या एका चाहत्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. दरम्यान, बिग बॉसचा खिताब जिंकल्यानंतर आता मुन्नवरच्या आयुष्याचे स्टार चांगलेच फिरलेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. फारुकीच्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची (New GirlFriend) एन्ट्री झाली आहे. 


इन्स्टग्रामवर शेअर केले फोटो 


मुन्नवर फारुकीसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन वीक अतिशय खास असणार आहे. बिग बॉसमुळे चर्चेत असलेल्या कॉमेडियन मुन्नवरने एका मुलीसमवेत आपले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मुन्नवर रोमँटिक अंदाजात पाहायला मिळतो आहे. मुन्नवरच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. बिग बॉस 17 मध्ये मुन्नवर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होत होती. शिवाय नाजिला सिताशी हिच्या त्याचे ब्रेकअप झाले असलाच्या चर्चांनीही जोर धरला होता. दरम्यान, आता मुन्नवरच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री झाली आहे. 


मुन्नवरला मिळाली नवी गर्लफ्रेंड 


मुन्नवर फारुकीने व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच शुक्रवारी नवी पोस्ट केली. इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुन्नवरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. यामध्ये त्याने कारमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुन्नवर फारुकी एका मुलीचा हात पकडताना दिसत आहे. ही मुलगी त्याच्या शेजारीच बसलेली आहे. 


व्हॅलेंटाईन वीकमध्येच प्रेमावर भाष्य 


बिग बॉस विजेता मुन्नवर फारुकीने व्हॅलेंटाईन वीकमध्येच आपल्या प्रेमाबाबत खुलासा केलाय. दरम्यान, हे व्हिडीओचे किंवा गाण्याचे प्रमोशन देखील असू शकते , असे चाहत्यांकडून बोलले जात आहे. खरे काय खोटे काय? हे आगामी काळात मुन्नवरकडूनच समजणार आहे. मु्न्नवरचे चाहते या मुलीबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. 


मुन्नवरला चाहत्यांकडून मिळताहेत शुभेच्छा


बिग बॉस 17 चा विजेता ठरल्यानंतर मुन्नवर फारुकीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. बिग बॉस विजेता बनण्यासाठी त्याचा मार्ग सोपा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करत त्याने तिथपर्यंत मजल मारली होती. गेम खेळण्यापेक्षाच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्याच्या चाहत्यांनी अशावेळीही त्याची साथ सोडली नव्हती. 


Photo Credit -Munawar Faruqui instagram 

इतर महत्वाच्या बातम्या 


Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!